ज्येष्ठ आणि युवकांशी अण्णा हजारेंचा मनमोकळा संवाद

मार्तंडराव बुचुडे
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

राळेगणसिद्धी येथील पद्मावती वस्तीवर जेष्ठ समाजसेवक अणा हजारे यांनी वयोवृद्धांसह तरूणांच्या सोबत बैठक घेऊन जुऩ्या नव्या आठवणींना ऊजाळा दिला. व त्यांच्याशी संवाद साधला.  

राळेगणसिद्धी : गावातीलच वयोवृद्धांसह समवयस्क व तरुणांच्या भेटीसाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नविन युक्ती शोधून काढली असून, दर महिन्याला गावातीलच एका मळ्यात रहाणाऱ्या वस्तीवर भेट देऊन त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्यात येणार आहेत. त्याची सुरूवात नुकतीच येथील पद्मावती वस्ती पासून करण्यात आली. यावेळी हजारे यांनी मला मोठी ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त केली.

हजारे यांनी राळेगणच्या पद्मावती वस्तीवर नुकतीच भेट दिली या वेळी वयोवृद्ध व गावातील सर्वात ज्येष्ठ असलेले सावळेराम पठारे, धोंडीबा पठारे, गंगाराम पठारे, बबन दसरे, लक्ष्मी पठारे, कासूबाई पठारे, अबई पठारे, तुळसा पठारे आदी मंडळी ऊपस्थीत होती. हजारे यांनी त्यांच्या बरोबर मनमोकळ्या गप्पा तर मारल्याच शिवाय तेथेच या जेष्ठांसमावेत जेवणही घेतले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश पठारे, दादा पठारे, शरद मापारी, दादाभाऊ गाजरे, सुभाष पठारे उपस्थित होते.

काळानुरूप गावात बदल झाला आहे. गावातील शेतकरी आपल्या सोयीनुसार शेतात वस्तीला रहाण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांची हजारे यांच्याशी गाठभेट दुरावली असून संवादही राहीला नाही. तसेच हजारे यांचे देशभरातील दौरे विविध आंदोलणे व हजारे यांना असलेली झेड सुरक्षा यामुळे त्यांचा दैनंदिन कार्यक्रम अतीशय व्यस्त झाला आहे. त्यामुळे हजारे यांचा वृद्धाबरोबरच, समवयस्कांचा व तरूणांचा संवाद हरवला होता त्यासाठी गावात महिन्याकाठी किमान एका वस्तीच्या परीसरात रहाणाऱ्या लोकांना एकत्र करूण घोंगडी बैठक आयोजन करण्याच ठरले आहे. त्याची सुरूवात हजारे यांनी ज्या पद्मावती वस्तीवर आपले बालपण घालवले तेथून करण्यात आली. या वेळी सुखदुःखाच्या गप्पा मारून एकमेकांना विविध समास्यांच्या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे सर्वांनाच एक नविन ऊर्जा मिळाली आहे. 
घोंगडी बैठकीच्या निमित्ताने हजारे पुन्हा एकदा गावातील जुन्या मंडळींना तरूण पिढीला भेटणार आहेत. त्यामुळे हजारे यांच्या समवेत असलेल्या जुन्या आठवणींना परत एकदा उजाळा मिळणार आहे. 

घोंगडी बैठकीच्या आयोजनात सुनील हजारे, भागवत पठारे, सुरेश दगडू पठारे, डॉ. बाळासाहेब पठारे, नाना पठारे, गवराम पठारे, दादाभाऊ पठारे, संतोष दसरे,संदीप वाघ, दिलीप पठारे, अक्षय पठारे, दादाराम पठारे आदींनी घोंगडी बैठक यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. या घोंगडी बैठकीची संकल्पना राळेगणसिद्धीचे उपसरपंच लाभेश औटी यांची आहे.

हजारे वस्तीवर आलेले पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर मोठा आंनद दिसत होता. त्यांनी सर्वांशी मनसोक्त गप्पा मारल्या व एकत्र जेवण केले. यावेळी हजारे म्हणाले तुम्हा सर्वांना भेटून मला मोठी प्रेरणा व ऊर्जा तर मिळालीच शिवाय माझे पाच वर्षांनी आयुष्य वाढले आहे. हजारे आपल्या घरी येणार व आपल्याला भेटणार आहेत यामुळे सर्व गावकऱ्यांच्या मनात त्यांच्या भेटीची उत्सुकता होती.