नागणसुरच्या विद्यार्थ्यांसाठी 'अन्नपूर्णा' योजना सुरू 

नागणसुरच्या विद्यार्थ्यांसाठी 'अन्नपूर्णा' योजना सुरू
नागणसुरच्या विद्यार्थ्यांसाठी 'अन्नपूर्णा' योजना सुरू

अक्कलकोट - सत्य साईबाबा लोकसेवा ट्रस्ट फूटपार्थि या बंगळुरू येथील संस्थेच्या वतीने नागणसुर ता. अक्कलकोट येथील जिल्हा परिषद कन्नड मुले व मुलींची शाळा येथे 'अन्नपूर्णा योजना' सुरु करण्यात आली आहे. ग्रामिण भागातील मुलांचे शिक्षण व्यवस्थित व्हावे आणि ती मुले शिक्षणात रममाण व्हावीत या उद्देशाने ही योजना राबविण्यात येणार आहे. सकाळच्या सत्रात एकूण ३४४ मुलांना दररोज दूध, बिस्कीट, केळी वा अल्पोपहार देण्याची सुविधा करण्यात आली आहे. या उपक्रमाची सुरुवात संस्थेचे समन्वयक मुळच्या नागणसुरच्या गीता राजू नाविंदगी, माजी सरपंच गिरमल डोंगरितोट, संजय नाविंदगी, भीमाशंकर धानशेट्टी, श्री. मुळे, श्री. कळसगोंडा, महानंदा बिरादार यांनी केली.

सत्य साईबाबा लोकसेवा ट्रस्ट, मुद्देनहळी (चिकबळ्ळापुर) येथील आश्रमाची बंगळुरू येथे शाखा आहे. त्यांच्या वतीने महाराष्ट्रातील सरकारी प्राथमिक शाळांतील मुलांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील मुले ही उपाशी पोटी जर शाळेत आली तर ते मानसिकदृष्ट्या अध्ययन करण्यासाठी तयार नसतात. त्यामुळे त्यांचे शिक्षणात लक्ष लागत नाही. त्यासाठी कर्नाटकमध्ये कार्यरत असलेल्या साई ट्रस्टच्या वतीने नागणसुर गावात दररोज सकाळी याची सुरुवात करून एक आदर्श कार्य सुरू केले आहे. ग्रामीण मुले आरोग्यदायी व गुणवत्तापूर्ण बनावी म्हणून या संस्थेच्या वतीने ही सोय करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील गरीब मुले शिक्षणापासून वंचित राहू नये असा आमचा प्रयत्न आहे. संस्थेचे सर्व व्यवहार हे पारदर्शक व ऑनलाईन आहेत. यासाठी स्वयंसेवी संस्था व व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन समन्वयक गीता नाविंदगी यांनी केले.

मुलांचे नियमित आरोग्य तपासणी, नैतिक शिक्षण आणि स्पोकन इंग्लिश आदी सुविधा सुद्धा भविष्यात विद्यार्थ्यांना ट्रस्टच्या वतीने देण्यात येणार आहे. भविष्यकाळात विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी लागणारे खर्च सुध्दा ट्रस्टद्वारे करण्याची योजना आहे. गीता राजू नाविंदगी यांनी आपल्या नागणसुर गावाचा अभिमान ठेवून महाराष्ट्रात प्रथम येथे ही योजना सुरू केली आहे. संस्थेच्या या कार्याबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. आजपर्यंत या संस्थेच्या वतीने राबविण्यात आलेल्या योजनांचा १५०४ शाळांतील १ लाख ३ हजार ७१० विद्यार्थी लाभ घेत आहेत. येत्या काळात एकूण ५ लाख मुलांना या योजनेत समाविष्ट केले जाणार आहे. यामुळे हजेरी वाढ, आरोग्य सुधारणा, शैक्षणिक उन्नती, शिक्षकांना प्रेरणा, सकारात्मक बदल दिसून येत आहेत. या उपक्रमाच्या सुरुवातीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बसवराज गुरव यांनी केले व आभार हणुमंत सुतार यांनी मानले.

कोपर्डी बलात्कार व खून खटल्यासंबंधीची बित्तमबातमी वाचा...

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com