चिकलठाण्यात तीन महिन्यानंतर खुनाचा उलगडा

योगेश पायघन
सोमवार, 18 डिसेंबर 2017

औरंगाबाद : तीन महिन्यांपूर्वी 22 वर्षीय युवक चिकलठाणाजवळ सुकना नदीच्या पुरात वाहून गेल्याची घटना घडली. त्या मयताच्या भावाने घातपाताचा संशय व्यक्त केल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक विजय पवार यांच्या पथकाने केलेल्या तपासात हा पूर्वनियोजित खून असल्याचे सोमवारी (ता 18) समोर आले आहे. यात चौघांना अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपीने त्याच्या वाहिनीशी असलेल्या अनैतिक संबंधातून खून केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा एकनाथ कोरडे या 22 वर्षीय तरुणाचा सुखना नदीत वाहून गेल्याची एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात नोंद होती. कृष्णा सुखना नदीत वाहून गेला नसून, त्याची हत्या झाल्याचा संशय कृष्णाच्या भावाने व्यक्त केला होता. तसा अर्ज गुन्हे शाखेकडे दिला होता. त्यावरून दीड महिन्यांपूर्वी तपास सुरू झाला. याप्रकरणी नारायण रतन गरंडवाल या मुख्य आरोपीसह समाधान गणेश भिले, राजू तुळशीराम पवार, सुनील रमेश घोगरे या चार आरोपीना अटक केली.

मुख्य आरोपीने मारहाण करत तिन्ही आरोपीची मदत घेऊन कृष्णा याचा कोयता आणि कुऱ्हाडीने त्याच्यावर वार करत हत्या केली. हत्येत वापरण्यात आलेले 2 कोयते आणि 1 कुऱ्हाड पोलिसांनी जप्त केली आहे. तर वाहिनीशी अनैतिक संबंध असल्याचा संशयाच्या रागातून कृष्णाच्याच मित्राच्या तीन मित्राच्या मदतीने खून केल्याचे शक्यता सहाय्यक पोलिस आयुक्त रामेश्वर थोरात यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: marathi news aurangabad crime news murder case