पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या नदीत बुडून चार मुलांचा मृत्यू

अभय जोशी
शनिवार, 10 जून 2017

चंद्रभागा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या चार बालकांचा पाण्यात बुडवून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पंढरपूर : चंद्रभागा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या चार बालकांचा पाण्यात बुडवून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आज दुपारी साडे चार वाजता चंद्रभागा घाटाजवळ धीरज अप्पा जुमाळे (वय 8) , श्रीपाद सुनील शहापुरकार (वय 6), गणेश सिद्धप्पा जुमाळे (वय 8), सौरभ अनिल शहापुरकार (वय 6) ही चार मुले पोहण्यासाठी गेली होती. दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने सर्वजण पाण्यात बुडाली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉक्‍टरांनी योग्य उपचार केले नसल्याचा आरोप मृत मुलांच्या नातेवाईकांनी केला आहे. संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात गर्दी असून पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे.