तडिपार शकिलाविरुद्ध आणखी एक गुन्हा 

तडिपार शकिलाविरुद्ध आणखी एक गुन्हा 

नागठाणे  - बोरगाव पोलिस व प्रोबेशनरी पोलिस अधीक्षक यांच्या पथकाने सापळा रचून देशमुखनगर ते मसूर मार्गावर चोरटी देशी दारू घेऊन निघालेली मोटार पकडली. या कारवाईत सुमारे दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईत पकडलेली मोटार ही तडीपार असणाऱ्या शकिला मुलाणी (रा. देशमुखनगर, ता. सातारा) हिची आहे. तिच्यासह चालक प्रमोद उत्तम शिंदे (रा. टिटवेवाडी, ता. सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

प्रोबेशनरी पोलिस अधीक्षक पवन बनसोडे व बोरगावचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार वसंत जाधव, स्वप्नील माने, सातारा पथकातील जवान धीरज भोसले, रोहित कणसे यांनी त्यांना मिळालेल्या माहितीनुसार देशमुखनगर येथे सापळा रचला होता. यावेळी एक मोटार संशयास्पदरित्या तेथे आढळून आल्याने या पथकाने ती थांबवून तिची तपासणी केली. यावेळी मोटारीत देशी दारूने भरलेले 50 बॉक्‍स आढळले. चालक प्रमोद शिंदे याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता हे बॉक्‍स तो मसूर (ता. कऱ्हाड) येथे घेऊन निघाल्याचे निष्पन्न झाले. ही मोटार शकिला मुलाणी हिची असल्याचेही स्पष्ट झाले. पोलिसांनी सुमारे सव्वा लाख रुपये किमतीच्या देशी दारूसह मोटार असा सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याप्रकरणी चालक प्रमोद उत्तम शिंदे याच्यासह तडीपार असणाऱ्या शकिला गुलाब मुलाणी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, तपास सहायक फौजदार वसंत जाधव करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com