'ग्रामसुरक्षा' यंत्रणेद्वारे केवळ एका कॉलवर मदत मिळणार !

'ग्रामसुरक्षा' यंत्रणेद्वारे केवळ एका कॉलवर मदत मिळणार !

तळेगाव दिघे ( जि. नगर ) - गावात चोरी झाली, आग लागली, लहान मुल हरवले, वाहन चोरीला गेले, शेतातील पिकाची चोरी झाली, अपघात झाला, वन्यप्राण्याने हल्ला केला अशा कुठल्याही आपत्तीच्या प्रसंगी केवळ १८००२७०३६०० या क्रमांकावर तक्रार केली अथवा मदत मागितली तर परिसरातील सगळे लोक तुमच्या मदतीला धावून येतील. आपत्कालीन ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे आता केवळ एका कॉलवर मदत मिळणार आहे. 

 संगमनेर ( जि. नगर ) तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमधील दोनशे पदाधिकाऱ्यांना ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे यांनी मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यावेळी उपस्थित होत्रे. ग्रामसुरक्षा यंत्रणा, या यंत्रणेचे कार्य, आपत्ती काळात ग्रामसुरक्षा यंत्रणेची होणारी मदत, एकाच वेळी सर्व ग्रामस्थाना ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत होणारे भ्रमणध्वनी कॉल व त्यातून आपटग्रस्तांना होणारी मदत याविषयी मार्गदर्शन केले. यापूर्वी घडलेल्या आपत्तीजनक घटना व ग्रामसुरक्षा यंत्रणा मार्फत केलेली कार्यवाही याचे मशीनद्वारे प्रात्यक्षित करून दाखवले. सध्याच्या काळात ग्रामसुरक्षतेचे महत्व याबाबत गोर्डे यांनी माहिती दिली. पो. हे. कॉ. परमेश्वर गायकवाड़ यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

एकाचवेळी अनेकांना कॉल.. 
आपत्तीच्यावेळी व दुर्देवी घटनांमध्ये जवळच्या व्यक्तिंना तातडीने संदेश मिळावा यासाठी व संकटकाळी १८००२७०३६०० या टोल फ्री नंबरवर फोन केल्यास त्याच आवाजात परिसरातील अनेक त्वरित मोबाइलवर ऐकू जातो. घटना घडताच एका कॉलवर माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते. याकामी गावातील लोकसंख्येच्या दुप्पट नोंदणी शुल्क आकारले जाते. एकाचवेळी पोलिसांसह मदतकार्य कार्यान्वित झाल्यास त्याचा फायदा होईल, असे या यंत्रणेचे संचालक गोर्डे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com