बारावीचा पेपर फुटल्याची अफवा 

बारावीचा पेपर फुटल्याची अफवा 

वैराग, (ता. बार्शी)  - बार्शी तालुक्‍यातील तांबेवाडी आश्रमशाळा केंद्रात बारावीचा पेपर फुटला, ही अफवा असल्याचे परीक्षा विभाग व पोलिस प्रशासनाने आज सांगितले. घटनास्थळी मुख्य परीक्षा परिरक्षक तथा गटशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे, वैराग पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किरण अवचर आदींनी भेट देऊन पाहणी केल्यानंतर ही माहिती दिली. 

या परीक्षा केंद्रात 394 विद्यार्थी परीक्षा देत होते. बुधवारी (ता. 21) इंग्रजी विषयाचा पहिला पेपर 11 वाजता सुरू झाला. पेपर फुटल्याच्या अफवेबाबत वैराग पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किरण अवचर म्हणाले, ""तांबेवाडी (ता. बार्शी) येथील ज्ञानदीप माध्यमिक आश्रमशाळा या बारावीच्या परीक्षा केंद्रात आज पहिला इंग्रजी विषयाचा पेपर होता. या केंद्रात 16 वर्गखोल्या असून, 394 पैकी 391 परीक्षार्थी परीक्षेस हजर होते. परीक्षा केंद्रात पहिल्या माळ्यावर तीन वर्गखोल्या; तर दुसऱ्या माळ्यावर 13 वर्गखोल्या आहेत. या केंद्रास चारही बाजूस भिंतीचे व तारेचे कंपाउंड आहे. या केंद्रात परीक्षेसाठी नेमणुकीस असलेले केंद्रप्रमुख, सुपरवायझर व कर्मचारी यांचे मोबाईल केंद्रप्रमुखाच्या कार्यालयातील कपाटात जमा केलेले होते. त्या केंद्रात दोन पोलिस व चार होमगार्ड असा पोलिस बंदोबस्त वैराग पोलिस स्टेशनकडून तैनात ठेवलेला होता. त्यामुळे या केंद्रातून प्रश्‍नपत्रिका फुटीची शक्‍यता नाही.'' 

मुख्य परीक्षा परिरक्षक तथा गटशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे म्हणाले, ""प्रश्‍नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली, ही अफवा असून ज्ञानदीप माध्यमिक आश्रमशाळा परीक्षा केंद्राच्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या केंद्रात असा प्रकार घडला नाही. व्हिडिओ व्हायरलप्रकरणी सायबर गुन्हे विभागामार्फत याची चौकशी व्हावी. हा व्हिडिओ ज्यांनी व्हायरल केला, त्याची चौकशी करून सविस्तर माहिती घेऊन संबंधितांविरोधात पोलिसांत तक्रार देण्याचे आदेश परीक्षा केंद्रप्रमुख शशिकांत देशमुख यांना दिले आहेत. या प्रकरणाचा अहवाल माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मुख्य विभागाकडे सविस्तर पाठविला आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com