स्वच्छतागृहातील चित्रफीत प्रकरणी गुन्हा दाखल

Marathi News Karhad News Crime filing case against Students
Marathi News Karhad News Crime filing case against Students

कऱ्हाड - येथील आयटीआय (शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था) महाविद्यालयातील मुलींच्या स्वच्छतागृह व शौचालयातील व्हिडीओ चित्रफीत व ऑडीओ रेकार्डीग करून ते व्हायरल केल्याचा प्रकार गंभीर प्रकारबाबत रितसर गुन्हा कऱ्हाड शहर पोलिसात दाखल झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यातील चार विद्यार्थ्यांना प्राचार्य टी. एन. मिसाळ यांनी तडकाफडकी महाविद्यालयातून निलंबीत केले आहे. याबाबत एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, अमीत जाधव, दिग्वीजय पाटील व संभाजी बिग्रेडचे शहाराध्यक्ष भूषण पाटील यांना काल गुन्हा दाखल व्हावा, यासाठी चार तासापेक्षा जास्त काळ प्राचार्यांच्या दालनात आंदोलन केले होते. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच त्यांनी माघार घेतली. 

येथील शासकीय आयटीआय कॉलेजमध्ये मुलामुलींना वेगवेगळे व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते. तेथे मुल व मुलीही शिक्षण घेतात. मुलीसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या दालनासमोर स्वच्छतागृह आहे. तेथेच व्हिडीओ चित्रीकरणाचा प्रकार झाला. सुमारे चार ते पाच दिवसांपूर्वी तेथे त्याच महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी त्या स्वचछतागृहात गेल्या असता त्यांचे व्हिडीओ चित्रीकरण केले होते. ती चित्रफीत सोशल मिडीयासह व्हॉटस् अॅपवर व्हायरल केली गेली. याची माहिती मुलींना समजताच मुलींनी प्राचार्य मिसाळ यांच्याकडे लेखी तक्रार केली. या प्रकरणी चौकशीसाठी समिती नेमली गेली. त्याचदिवशी ज्यांनी चित्रफीत केली त्या मुलांनी चालू वर्गात घुसून त्या मुलींना धमकी दिली. त्याचीही कॉलेजने दखल घेतली. त्या प्रकरणात दोषी असलेल्या केदार गायकवाड, ऋषीकेश महाजन, युवराज मोरे व शुभम कानडे यांना त्वरीत निलंबीतही करण्यात आले. मात्र तरीही त्यांचा वावर होता. यातील एकजण वस्तीगृहात राहत नव्हता तरीही त्याचे महिनाभर तेथे वास्तव्य होते. तोही प्रकार कॉलेज व्यवस्थापनाच्या लक्षात आला. त्यावरही कारवाई करणार असल्याचे प्राचार्यांनी सांगितले. मात्र या प्रकाराची माहिती विद्यार्थी संघटनांनसह अन्य संघटनांना समजली. त्यांनी आज प्राचार्यांना घेराव घालून त्याबाबत जाब विचारला.

एनएसयुआय विद्यार्थी संघटनेने घेराव घातला. त्यांनी झालेल्या प्रकाराबाबत प्राचार्यांना जाब विचारला. त्यावेळी मुलींच्या स्वच्छतागृह व शौचालयात शिरून चार मुलांनी व्हिडीओ चित्रीकरण केले आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे त्यानुसार या प्रकरणी चार विद्यार्थ्यांना निलंबीत केले आहे, अशी माहिती प्राचार्यांनी दिली. तरीही या प्रकरणात रितसर गुन्हा दाखल करा. तो दाखल होत नाही. तोपर्यंत प्राचार्यांच्या दालनातून उठणार नाही, अशी भुमिका संघटनेने घेतली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. तीन तासापेक्षा जास्तकाळ संघटनेचे पदाधिकारी तेथे बसून होते. या प्रकरणाबाबत महाविद्यालयाने भक्कम भुमिका न घेतल्यास आज महाविद्यालय बंद करून देणार नाही आणि प्राचार्यांसह कोणालाच काम करून देणार नाही, असेही यावेळी संघटनेने जाहीर केले. त्यावेळी प्राचार्य मिसाळ यांच्यासह संघटनेचे काही पदाधिकारी ती तक्रार देण्यास पोलिस ठाण्यात गेले. 

संबधित मुलांना कॉलेजमधून निलंबीत केल्यानंतर ती क्लीप अनेकांनी डीलीट केली. याबाबत पोलिसांनी काल रात्री गुन्हा दाखल झाल्याची माहिती देत अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले. पोलिस उपाधिक्षक नवनाथ ढवळे म्हणाले, कऱ्हाडच्या शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजमधील प्रकाराबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, मुलींच्या स्वच्छतागृहात कोणीही नसताना काही विद्यार्थ्यांनी स्वच्छतागृहाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांना हा प्रकार समजल्यावर तात्काळ कार्यवाही करत निर्भया पथकासह शहर पोलिसांनी याप्रकरणाची तपासणी सुरू केली. निर्भया पथकाने विद्यार्थ्यांनी तयार केलेली मोबाईल क्लिपची खातरजमा केली. या क्लिपमधे मुलींच्या स्वच्छतागृहाचा परिसर दिसत आहे. क्लिपमधे वसतीगृहाच्या आवारात कोणतीही मानवी हालचाल दिसत नाही. तिथे कोणीही नसताना हे मोबाईल चित्रीकरण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र तरीही मुलींच्या वसतीगृहात बेकायदेशीररित्या प्रवेश करून तेथील परिसराचे चित्रीकरण केल्याप्रकरणी संबधितांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करून योग्य त्या कारवाईला सुरूवात केली. मात्र याप्रकरणाचा गैरफायदा घेऊन सोशल मिडीयावर काहीजण अफवा पसरवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्या अफवांवर विश्वास ठेवू नये.

आयटीआयच्या ज्या चार मुलांनी स्वच्छतागृहाचे शुटींग केले. त्यातील एक मुलगा अनाधिकृतपणे त्या कॉलेजच्या वस्तीगृहात राहत होता, अशी माहिती प्राचार्य मिसाळ यांनी दिली. त्यावेळी तेथे जमलेल्या संघटनांनी तीव्र निषेध नोंदवत त्या वस्तीगृहाच्या अधिक्षकाला निलंबीत करण्याची मागणी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com