सांगली: 'राष्ट्रवादी'च्या पुनःबांधणीची जयंतराव, मानसिंगरावांवर जबाबदारी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

शिराळा : जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुनर्बांधणीची जबाबदारी आमदार जयंतराव पाटील व मानसिंगराव नाईक यांच्यावर असून, सध्याच्या शासनाकडून लोकांची निराशा झाल्याने 'राष्ट्रवादी'स पोषक वातावरण आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांनी सक्रिय होऊन गावागावांत 'राष्ट्रवादी'चा झेंडा फडकवावा, असे प्रतिपादन 'राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी केले. 

चिखली (ता. शिराळा) येथे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा छाया पाटील, युवती जिल्हाध्यक्षा वर्षा वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री. शिंदे म्हणाले, की जिल्ह्यातील अनेक जण 'राष्ट्रवादी'ला सोडून गेले. त्यामुळे अनेक तालुक्‍यांत अडचणी निर्माण झाल्या. परंतु, त्यावर आम्ही मार्ग काढत असून, आता जिल्ह्यात आर. आर. यांच्यानंतर जयंतराव व मानसिंगराव यांच्यावर पुनर्बांधणीची जबाबदारी आहे. सध्याच्या शासनाची ध्येयधोरणे लोकांना पसंत नसल्याने ते 'राष्ट्रवादी'ला पसंती देत आहेत. प्रत्येक तालुक्‍यात मोर्चेबांधणी सुरू आहे. शिराळा तालुक्‍यात 'राष्ट्रवादी' आघाडीवर आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीनंतर आता ग्रामपंचायतीत वर्चस्व ठेवण्यासाठी महिलांनी कामाला लागावे. 

मानसिंगराव नाईक म्हणाले, की ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांनी हिरीरीने भाग घेऊन काम करावे. शक्‍य असेल त्या ठिकाणी आघाडी केली जाईल, अन्यथा स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवून कामाला लागा. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत 'राष्ट्रवादी'च्या 100 टक्‍के जागा निवडून आल्याने नंबर वनवर आहे. नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्‍के यांनी प्रास्ताविक केले. या वेळी छाया पाटील, वर्षा वाघमारे, सुनीता नाईक, नंदा पाटील, अर्चना शेटे, रूपाली भोसले, रूपाली पाटील, निलोफर डांगे, साधना पाटील यांनी मनोगत व्यक्‍त केले. 

कार्यक्रमास बाळासाहेब पाटील, निरीक्षक आनंदराव पाटील, 'राष्ट्रवादी'चे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, जिल्हा परिषदेच्या सदस्या अश्‍विनी नाईक, आशा झिमूर, कमल पाटील, अनुसया माने, मनीषा गुरव, आशाताई कांबळे, सुनीता निकम, प्रतिभा पवार, सुजाता इंगवले, कांताताई यमगर, मनीषा गुरव, मंगल पाटील उपस्थित होत्या. डॉ. मीनाक्षी पाटील यांनी आभार मानले. 
 
Web Title: marathi news kolhapur news NCP politics