संजय घोडावत विद्यापीठाचे डॉ. बी. एम. हिर्डेकर कुलसचिव

Kolhapur Sanjay Ghodawat
Kolhapur Sanjay Ghodawat

जयसिंगपूर : अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. बी. एम. हिर्डेकर यांची नियुक्ती झाली. विद्यापीठाचे अध्यक्ष, उद्योगपती संजय घोडावत यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन डॉ. हिर्डेकर यांचे स्वागत केले.

संजय घोडावत ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सची अल्पावधीत झालेली नेत्रदीपक प्रगती, वर्ल्ड क्‍लास इन्फ्रा, नॅककडून 'अ' दर्जा, एनबीए मानांकन, आयएसओ मानांकन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध असणारा प्राध्यापक वर्ग यांचे परीक्षण करून शासनाने विद्यापीठाला मान्यता दिली आहे. 

गेल्या 40 वर्षांपासून डॉ. हिर्डेकर शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. माध्यमिक शिक्षक, प्राध्यापक ते प्राचार्य अशा पदांवर काम करत त्यांनी शिवाजी विद्यापीठात उपकुलसचिव, परीक्षा नियंत्रक म्हणूनही उल्लेखनीय काम केले आहे. परीक्षा नियंत्रक पदाच्या त्यांच्या कार्यकाळात तत्पर, जबाबदार, स्वच्छ आणि पारदर्शी प्रशासनाचा ठसा उमटवला आहे. परीक्षांचे नेटके नियोजन, विहित वेळेत निकाल लावण्याच्या त्यांच्या कामगिरीचे राज्यपालांनीही कौतुक केले आहे. विद्यार्थिभिमुख संवेदनशील प्रशासन ही त्यांची खासीयत आहे. 

त्यांनी विद्यापीठ प्रशासनावर पीएच.डी. केली आहे. त्याचबरोबर इंग्रजी साहित्य, शिक्षणशास्त्र या विषयांत पदव्युत्तर पदव्या धारण केल्या आहेत. कायद्याचेही ते पदवीधर आहेत. आपल्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कारकिर्दीबरोबर त्यांनी व्यासंगी वक्ता म्हणूनही ओळख निर्माण केली आहे. ब्रेन पॉवर, बॉडी लॅंग्वेज, व्यक्तिमत्त्व विकास, इमोशनल इंटेलिजन्स, उच्च शिक्षणातील दर्जा, कम्युनिकेशन अशा विविध विषयांवर त्यांनी प्रभावी व्याख्याने दिली आहेत. इंग्रजी व शिक्षणशास्त्र या विषयांवरील रिसोर्स पर्सन म्हणून त्यांनी अनेक चर्चासत्रांतून मार्गदर्शन केले आहे. 

विविध विषयांवरील राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील परिषदा, सेमिनारमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. विविध नियतकालिके, वर्तमानपत्रांतून त्यांनी लेखन केले आहे. गरजू पालक, विद्यार्थी विशेषत: सैन्यदलात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ते मोफत मार्गदर्शन करतात. 

या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. ए. रायकर, विश्‍वस्त विनायक भोसले उपस्थित होते. 

संजय घोडावत विद्यापीठ राज्यातील नव्याने स्थापित झालेले विद्यापीठ आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन चांगल्या दर्जाचे पदवीधर तयार करणे हे आमचे ध्येय आहे. त्यासाठी सदैव कार्यरत राहू. 
- प्राचार्य डॉ. बी. एम. हिर्डेकर, कुलसचिव, संजय घोडावत विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com