ललिता बाबरच्या घरचा मान्यवरांकडून पाहुणचार 

ललिता बाबरच्या घरचा मान्यवरांकडून पाहुणचार 

मलवडी - विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्यासह खासदार विजयसिंह मोहिते- पाटील, आमदार जयकुमार गोरे, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी काल ऑलिंपिक धावपटू व अर्जुन पुरस्कार विजेती खेळाडू ललिता बाबर यांच्या मोही (ता. माण) येथील घरी पाहुणचार घेतला. 

उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत व ललिता बाबर यांच्या सत्कारानिमित्त हे सर्व मान्यवर मोही येथे एकत्र आले होते. सत्कार समारंभ झाल्यानंतर ललिता बाबर यांनी या मान्यवरांना चहापानाचा आग्रह केला. त्यामुळे रात्री पावणेदहाच्या सुमारास सर्व जण मोरांगी मळा वस्तीवरील बाबर यांच्या घरी गेले. या वेळी किरण भगतही ललिताच्या घरी आले. या वेळी या दोघांच्या भावी वाटचालीबाबत मनमोकळी चर्चा झाली. चहापान सुरू असतानाच रस्त्याचा, तसेच मोबाइल टॉवरचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी झाली. 

सर्व मान्यवरांनी लवकरच प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. आपल्या विनंतीस मान देऊन सर्व जण चहापानास आल्याबद्दल ललिताने सर्वांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com