सोयाबीनच्या काढणी-मळणीवर पावसाचा परिणाम

बाळासाहेब कांबळे 
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

हुपरी ( जि. कोल्हापूर) : हुपरी परिसरात मागिल आठवड्यात विजेच्या कडकडाटांसह कोसळलेल्या जोरदार पावसानंतर गेले तीन - चार दिवस पावसाची रिपरिप सुरुच आहे. आभाळ काळवंडलेलेच असून अधुनमधून उघडिप देत पाऊस मात्र कायम आहे.

शेतात पाणीच पाणी झाल्याने त्याचा परिणाम भुईमूग, सोयाबिन , भात पिकाच्या काढणी व मळणीवर होणार आहे .पाऊस असाच सुरु राहिल्यास ही पिके धोक्यात येण्याची भिती व्यक्त होत आहे. 

गत आठवड्यात हुपरी सह रेंदाळ, पट्टणकोडोली, यळगुड, इंगळी, तळंदगे, रांगोळी , जंगमवाडी परिसरास पावसाने झोडपून काढले होते. दिवसभर कडक ऊन अन् सायंकाळ नंतर जोरदार पाऊस असे वातावरण होते.

मात्र , गेल्या तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरुच आहे. अधुनमधून काही क्षणांची विश्रांती घेत मध्यम तसेच किरकोळ स्वरुपाच्या पावसाच्या सरी पडत आहेत. काळवंडलेले आभाळ आणि गार हवा यामुळे वातावरणात गारठा पसरला असून दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :