राजमाची येथे जखमी भेकरावर उपचार

सचिन शिंदे
शनिवार, 13 जानेवारी 2018

सुर्लीच्या अलीकडे असलेल्या पाझर तलावाजवळ भेकर जखमी अवस्थेत सापडले. ते पाणी पिण्यासाठी आले असावे, असा अंदाज वन विभागाने वर्तवला.

कऱ्हाड : राजमाची येथे आज सकाळी जखमी भेकर आढळून आले. त्याच्या पायाला जखम झाली. ग्रामस्थांनी त्याला पकडून पशूवैद्यकीय रूग्णालयात आणले. तेथे वन विभाग आणि पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पशूवैद्यकीय अधिकारी डाॅ. परिहार यांनी त्याच्यावर उपचार केले. 

भेकराचा पाय आपटला गेल्याने त्याला जखमी झाली असावी, असा अंदाज डाॅ. परिहार यांनी व्यक्त केला. सुर्लीच्या अलीकडे असलेल्या पाझर तलावाजवळ भेकर जखमी अवस्थेत सापडले. ते पाणी पिण्यासाठी आले असावे, असा अंदाज वन विभागाने वर्तवला. भेकराची प्रकृती सुधारत असून, आणखी तीन दिवस त्याच्यावर उपचार करावे लागतील. त्यानंतर त्याला सुरक्षित जंगलात सोडता येईल, असे वन विभागाचे अधिकारी बाबा शिंदे यांनी स्पष्ट केले. 

 

Web Title: marathi news local karad news injury animals