व्हिसा संपल्यामुळे मलेशियात अडकलेला तरुण मायदेशी परत

किरण  चव्हाण 
रविवार, 17 डिसेंबर 2017

सोलापूर : व्हिसा संपल्यामुळे मलेशियात अडकलेला शिंदेवाडी (ता. माढा) येथील अजय सुभाष शिंदे (वय 24) हा तरुण रविवारी सकाळी मायदेशी परतला असून, उद्या (सोमवार) शिंदेवाडी येथे येणार आहे.

सोलापूर : व्हिसा संपल्यामुळे मलेशियात अडकलेला शिंदेवाडी (ता. माढा) येथील अजय सुभाष शिंदे (वय 24) हा तरुण रविवारी सकाळी मायदेशी परतला असून, उद्या (सोमवार) शिंदेवाडी येथे येणार आहे.

व्हिसा फसवणूक प्रकरणात महाराष्ट्रातील काही तरुणांना मलेशियात अटक झाली होती. तसेच काही तरूण व्हिसा संपल्याने मलेशियात अडकले होते. माढा तालुक्यातील शिंदेवाडी येथील अजय सुभाष शिंदे हा तरूणही मागील तीन महिन्यांपासून मलेशियात होता. त्याचा टूरिस्ट व्हिसा संपला होता. त्यानंतर त्याला वर्किंग व्हिसा मिळाला नाही. शिंदे यांनी भारतीय दूतावासाशी संपर्क केला होता. रविवारी ( ता. 17 ) सकाळी दहाच्या सुमारास शिंदे हे विमानाने तिरूचिरापल्ली येथे आले असून, तेथून माढयाकडे निघाले आहेत. उद्या (सोमवार) ते शिंदेवाडी येथे पोहचणार आहेत.

शिंदे हे सुखरूप भारतात परतल्याने त्यांच्या कुटुंबियांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. मलेशियातील काही तरूणांना अटक झाल्यापासून शिंदे हे सातत्याने कुटुंबीयांच्या संपर्कात होते. त्यांनी याबाबत मलेशियातील भारतीय दूतावासाशीही संपर्क साधला होता. त्यामुळे त्यांना भारतात सुखरूप परतणे शक्य झाले. शिंदे यांच्याबरोबर इतर चौघे भारतात आले आहेत.

सांगली येथील व्हिसा फसवणूकप्रकरण 'सकाळ'ने उजेडात आणल्यानंतर अनेकांची याबाबत फसवणूक होऊन मलेशियात अडकल्याचे समोर आले. यात माढा तालुक्यातील अजय शिंदेंचाही समावेश होता. याबाबत  'सकाळ'ने 11 डिसेंबर रोजी अजय शिंदेच्या भारतात परतण्याची अशा पल्लवित असे वृत्त दिले होते. त्यानंतर आता तो मायदेशी परतला आहे.

Web Title: marathi news local visa expired Malaysia ajay shinde return to India