डॉ. भीमराव गस्ती यांना बेळगाव महापालिकेतर्फे श्रद्धांजली

मल्लिकार्जुन मुगळी
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

बेळगाव : साहित्यिक व समाजसेवक डाॅ. भीमराव गस्ती यांना मंगळवारी बेळगाव महापालिकेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

मंगळवारी महापालिकेत गणेशोत्सव पूर्वतयारी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या प्रारंभी महापौर संज्योत बांदेकर यानी डाॅ. गस्ती यांच्या श्रद्धांजलीचा ठराव मांडला.

आमदार संभाजी पाटील यानी डाॅ. गस्ती यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. बैठकीला उपस्थित सर्व अधिकारी व गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिखार्यानी मौन पाळून श्रद्धांजली वाहीली. डाॅ. गस्ती हे मूळचे यमनापूर गावचे असून त्यांच्या निधनामुळे बेळगावच्या सामाजिक व साहित्यिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थितानी व्यक्त केली.