फ्रेंडशिप बॅण्डवर 'डेव्हिड गुट्टा'ची क्रेझ 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

कोल्हापूर : फ्रेंडशिप बॅण्डवर फ्रेंच डी. जे. डेव्हिड गुट्टाची 'क्रेझ' आली आहे. जगप्रसिद्ध डी.जे.चे नाव लिहिलेला बॅण्ड एकमेकांना देऊन फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी आज दिवसभर तरुण-तरुणी मग्न राहिले. फ्रेंडशिप डेच्या पूर्वसंध्येला अनेक स्टॉलवर तरुणाईने खरेदीसाठी गर्दी केली होती. सुपर मॅन, आयर्न मॅन, बॅट मॅन, टुमारो लॅण्डच्या बॅण्डनाही मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

'फ्रेंडशिप डे' म्हणजे मैत्री साजरी करण्याचा दिवस मानला जातो. शाळेच्या विद्यार्थ्यांपासून ते कॉलेज तरुण-तरुणींपर्यंत हा दिवस साजरा करण्याची क्रेझ आली आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने उभारलेल्या राख्यांच्या स्टॉलवरच फ्रेंडशिप डेच्या बॅण्डची विक्री सुरू आहे. शहरातील राजारामपुरी, भवानी मंडपासह मोक्‍याच्या ठिकाणच्या स्टॉलवर बॅण्डची विक्री अधिक होत आहे. देश-विदेशांतील व्यक्ती आणि संस्थांची नावे लिहिलेल्या बॅण्डची यंदा क्रेझ असल्याचे दिसून येते. 

दहा रुपयांपासून पन्नास रुपयांपर्यंत बॅण्डच्या किमती आहेत. छोट्या आणि नाजूक अंगठ्याही आहेत. अंगठीवर 'फ्रेंडशिप' असे लिहिलेले आहे. फ्रेंचमधील डी.जे. डेव्हिड गुट्टा यांचे नाव सध्या तरुणाईत चर्चेत आहे. त्यांच्या नावाच्या बॅण्डलाच तरुणाईकडून अधिक पसंती मिळत असल्याचे राजारामपुरीतील विक्रेते दत्तात्रय दीक्षित यांनी सांगितले. गुट्टा यांच्याबरोबरच आयर्न मॅन, सुपर मॅन, बॅट मॅन, वन लव्ह, मोनोस्टार, ह्युमन बीइंग, टुमारो लॅण्ड, लेदर लॅण्ड यांच्या बॅण्डलाही मागणी असल्याचे विक्रेते शुभम पाटील यांनी सांगितले. साधारण गेले दोन-तीन दिवस रोज पन्नास-साठ बॅण्डची विक्री एका स्टॉलवर होत आहे.