राधानगरी धरण : पूरस्थिती नियंत्रणासाठी विसर्ग 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

राधानगरी : जलाशय पाणी पातळी वाढेल तसा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येत असल्याने यंदा पाणलोट क्षेत्रात गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस होऊनही राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले झालेले नाहीत. गतवर्षी 4 ऑगस्टला धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते. यंदा पूरस्थिती टाळण्यासाठी व अतिरिक्त पाण्याचा अधिक वीजनिर्मितीसाठी वापर, या उद्देशाने जलसंपदा विभागाने धरणातून विसर्गाचे काटेकोर नियोजन केल्याने धरण सांडवा पातळीपर्यंत भरले तरीही स्वयंचलित दरवाजे खुले झाले नाहीत. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित झाली आहे. 

जलाशय पाणी पातळी 347.50 फुटांपेक्षा अधिक झाल्यानंतर धरण संचय क्षमतेपेक्षा अधिक पाणी बाहेर सोडणारे स्वयंचलित दरवाजे खुले होतात. खुल्या झालेल्या दरवाजांतून होणारा नऊ हजार क्‍युसेक्‍स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात येत राहिल्याने भोगावतीला महापूर येतो. यामुळे नदीकाठच्या पिकांची हानी, दळणवळण व्यवस्था खंडित, पूररेषेतील गावांना धोका उद्‌भवतो. यास्तव यंदाच्या पावसाळ्यात जलाशय पाणी पातळी 345 फुटांपर्यंत पोचल्यानंतर वीजनिर्मितीसाठी पाणी सोडण्यात येत आहे.

वीजनिर्मितीसाठी प्रतिसेकंद दोन हजार क्‍युसेक्‍स पाणी विसर्ग सुरू राहिल्याने जलाशय पाणी पातळी नियंत्रित राहिली आहे. पाणी पातळी 347.50 फुटांपेक्षा अधिक न वाढल्याने स्वयंचलित दरवाजे खुले झालेले नाहीत. यावर्षी कदाचित पाणलोट क्षेत्रात प्रचंड अतिवृष्टी झाली आणि विसर्ग होणाऱ्या पाण्यापेक्षा अधिक पाण्याची आवक जलाशयात होईल, त्यावेळीच स्वयंचलित दरवाजे खुले होणार आहेत. सद्यःस्थितीत तरी पाणी पातळी नियंत्रित राहिल्याने व विसर्गाचे नियोजन व्यवस्थित झाल्याने पूरस्थिती टळली आहे. वीजनिर्मितीसाठी प्रतिसेकंद 1200 क्‍युसेक्‍स पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे.