कोयना धरणात ८५.१७ टीएमसी पाणीसाठा

सचिन शिंदे 
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

कर्‍हाड : कोयना धरणात चोवीस तासात ००.७७ टीएमसीने पाणी साठा वाढला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावासाचा जोर ओसरला असला हलक्या व कधीतरी मध्यम स्वरूपाचा पाऊस येत आहे.

गेल्या चोवीस तासांत धरणात ०.७७ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. धरणात आज ८५.१७ टीएमसी पाणी साठा आहे. गेल्या पाच दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे.

धरणात येणारी पाण्याची आवक कमी झाली. त्यामुळे धरणाचे वक्र दरवाजे बंद केले. काल पायथा वीज गृहातून सोडण्यात येणारे दोन हजार २९८ क्युसेक पाणी सोडण्याचे धरण व्यवस्थापणाने बंद केले आहे.

चोवीस तासांत कोयनानगरला ३६ (३३६३), नवजाला ५९ (३७२०) व महाबळेश्र्वरला ५८ (३१९५) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणाची पाणी पातळी २१४६.१० फुट झाली आहे. कोयना जलाशयात प्रतिसेकंद नऊ हजार २९८ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.