'शेतकऱ्यांची पोर' चक्काजाम आंदोलन करणार

हरिभाऊ दिघे
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

तळेगाव दिघे (जि. नगर) : शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी संगमनेर तालुका शेतकरी संघटनांची सुकाणू समिती व 'आम्ही शेतकऱयांची पोरं' या विद्यार्थी संघटनेच्यावतीने सोमवार (१४ ऑगस्ट) रोजी चक्‍काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

संगमनेर तालुका शेतकरी सुकाणू समितीच्यावतीने नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर व घुलेवाडी शिवारातील हॉटेल स्टेट्स समोर, कोल्हार - घोटी राज्य महामार्गावरील वडगावपान व चिखली येथे डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली तसेच 'आम्ही शेतकऱयांची पोरं' या विद्यार्थी संघटनेच्यावतीने राज्य समन्वयक लहानू सदगीर यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरच्या बस स्थानकासमोर समोर चक्‍काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनात शेतकऱयांनी व शेतकऱ्यांच्या पोरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यार्थी संघटनेचे राज्य समनव्यक लहानू सदगीर, सुकाणू समितीचे तालुका समन्वयक अभिजित दिघे, तुकाराम हासे व आम्ही शेतकऱयांची पोरं या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.

Web Title: marathi news marathi website Nagar Farmer's Loan waiver