तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचा काळी फीत लावून निषेध

राजशेखर चौधरी
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सर्व संघटनाची मिळून समन्वय समितीद्वारे १ नोव्हेंबर २००५ रोजी शासनाने लादलेल्या अन्यायकारक अटींच्या निषेध म्हणून आज १ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील सर्व शिक्षकांनी काळी फीत लावून काम केले आणि शासनाचे लक्ष वेधून ही त्रुटी दूर करण्याची मागणी केली आहे.

अक्कलकोट तालुक्यातील शिक्षकांसाठी काम करणाऱ्या सर्व संघटनांच्या व मराठी कन्नड व उर्दू माध्यमांच्या मिळून ११०० शिक्षकांनी आज निषेध नोंदविला. त्यांची डीसीपीएस योजना बंद करून जुनी पेन्शन योजना चालू करण्यासंबंधी हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. तालुक्यात सर्व शिक्षकांनी एकजुटीने या संदर्भात लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. याचबरोबर हे सर्व शिक्षक शनिवार दि. ४ नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

त्यात जुनी पेन्शन योजना सुरू करणे, पद्दोनतीचे अन्यायकारक नवीन जी आर रद्द करणे, फेब्रुवारी २०१७ मधील शिक्षकांच्या बदली धोरणातील अन्यायकारक त्रुटी दूर करून सुधारणा करणे या तीन मुख्यबाबींसाठी अन्याय होत आहे म्हणून आंदोलन केले जाणार आहे. शासन शिक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, असे सर्व संघटनांचे म्हणणे आहे.