बेळगावात वृद्ध दाम्पत्याची गळफासाने आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

बेळगाव : वृद्ध दाम्पत्याने आपल्या अपार्टमेंटच्या पॅसेजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (सोमवार) सकाळी उघडकीस आली. 

नारायण किल्लेकर (वय 80) आणि वसुंधरा (70) अशी त्यांची नावे आहेत. माजी उपमहापौर आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांचे ते सासू सासरे तर व्यावसायिक सुहास किल्लेकर यांचे आई-वडील होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही; मात्र आजारपणामुळे त्यांनी हे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. 

रेल्वे स्थानकाजवळील न्यू गुड्‌स शेड रोडशेजारी असलेल्या विमल प्लाझा अपार्टमेंटमध्ये हा प्रकार मध्यरात्री दोनच्या सुमारास घडल्याचा अंदाज आहे. पहाटे सहाच्या सुमारास सुरक्षा रक्षक आत गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यावेळी त्यांचा मुलगा, सून आणि नातवंडे घरात झोपले होते. 

पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह उतरविण्यात आले. त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार होतील. आत्महत्या करण्यापूर्वी अपार्टमेंटच्या पॅसेजमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर चिकटपट्टी लावण्यात आली होती, असे पोलिसांना आढळून आले. 

मूळचे भोई गल्लीचे रहिवासी असलेले किल्लेकर कुटुंब काही काळापूर्वीच न्यू गुड्‌सशेड रेडला रहायला गेले होते. घटनेची माहिती मिळताच अनेक बेळगावकरांनी अपार्टमेंटसमोर गर्दी केली होती.