पंतप्रधान मोदींची नोटाबंदी सपशेल अपयशी : पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदींची नोटाबंदी पहिल्या दिवसांपासूनच सफशेल अपयशी ठरली. ना काळा पैसा बाहेर आला, ना आतंकवाद थांबला. रिझर्व्ह बॅंकेचे तीन हजार कोटींचे नुकसान झाले. सर्वसामान्य जनतेला त्रास देऊन सरकारला काय मिळाले, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. 

रिझर्व्ह बॅंकेने नोटाबंदीबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात 99 टक्के नोटा परत जमा झाल्या; तर 16 हजार 50 कोटी अद्याप परत आलेले नसल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 'नोटा बंद'संबंधी दै. 'सकाळ'शी संवाद साधला.

त्या वेळी ते म्हणाले, 'मोदींचा नोटाबंदीचा निर्णय अपयशी ठरणार हे विधानसभेतील भाषणातही मी सांगितले होते. देशाचा विकासाचा दरही घटणार असल्याचे नमूद केले होते. मोदींनी नऊ महिने प्रयत्न केले. नोटाबंदीनंतर काळा पैसा बाहेर येणार, आतंकवाद कमी होईल, सर्व पैसा 100 टक्के परत येणार, असे सांगितले जात होते; पण मोदींच्या या निर्णयाने धड काळा पैसा बाहेर आला नाही, ना आतंकवाद कमी झाला. उलट रिझर्व्ह बॅंकेला तीन हजार कोटींचा फटका बसला.''

जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी बॅंकेच्या रांगेत उभ्या असलेल्या 105 लोकांना जीव गमवावा लागला. सर्वसामान्य जनतेला त्रास देऊन सरकारला काय मिळाले, असा प्रश्‍न श्री. चव्हाण यांनी उपस्थित केला.