राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले

राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. दुपारी साडेबाराला 3 नंबर व 6 नंबरचा स्वंयचलित दरवाजा उघडला आहे.

या दोन्ही दरवाजांतून अनुक्रमे 2200 व 2856 असा एकूण 5056 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग होत होत आहे. त्यामुळे भोगावती, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीवर झपाट्याने वाढ होणार आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील समृध्दी वाढविण्यासाठी कारणीभूत असणारे राधानगरी धरण आज पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील तुळशी, कडवी, जंगमहट्टी, घटप्रभा, कोदे हे तीन लघु पाटबंधारे पूर्ण भरले आहेत. 

आज दुपारी 1.30 पर्यंतचा धरणातील सध्याचा आणि कंसात एकूण पाणीसाठा क्षमता: 

  • राधागरी - 8.36 (8.36 टीएमसी),
  • वारणा 33.88 (34.399),
  • दुधगंगा 22.71 (25.393),
  • तुळशी 3.47 (3.47 टीएमसी)


'राधानगरी धरण भरले आहे. दोन स्वंयचलित दरवाजे उघडले आहेत. पाण्याचा विसर्ग वाढला असून नदीपात्रातील पाणी पातळी वाढत आहे. त्यामुळे लोकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे', अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com