कोपर्डी खटला : भवाळ, भैलुमेच्याही मनातही अत्याचार करण्याची सुप्त भावना होती !

Representational Image
Representational Image

नगर : कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून खटल्याच्या अंतिम युक्तिवादात विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी आज दुसऱ्या दिवशीही म्हणणे मांडले. तिन्ही आरोपींनी कसे कृत्य केले, त्यानी अत्याचार व खुन करण्यासंदर्भांत कसा कट रचला याबाबतचे 24 परिस्थितीजन्य मुद्दे मांडले. आरोपी एकने अत्याचार केल्यावर अन्य आरोपी संतोष भवाळ व नितीन भैलुमे या दोघांच्याही मनात अत्याचार करण्याबाबत मनातही सुप्त भावना होती असे आपल्या युक्तीवादात ऍड. निकम यांनी स्पष्ट केले.

कोपर्डी बलात्कार व खून खटल्याचा अंतीम युक्तीवाद नगरच्या जिल्हा न्यायालयात विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरु आहे. आज दुसऱ्या दिवशी ऍड. निकम यांनी घटनेत आरोपी जितेंद्र शिंदेसोबत आरोपी क्रमांक दोन संतोष भवाळ व आरोपी नंबर तीन नितीन भैलुमे यांचा कसा सहभाग आहे. तिघांनी मिळून हा प्रकार कसा केला याबाबत परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे 24 मुद्दे मांडले.

''पिडीत मुलीचा मृत्यू अनैसर्गिक झालाय, घटनेनंतर जखमी पिडीतेसोबत आरोपी शिंदेला पाहिले, घटनेनंतर तो दोनदिवस फरार होता. त्यांच्या गळ्यातील चैन घटनास्थळी सापडली, तपासणीत त्याने अनेक बाबीची उत्तरे खोटी दिली, त्याने घटनेआधी दुचाकी खेरदी केली, आरोपीचे रक्ताळलेले कपडे मिळाले, पिडीतेच्या अंगावर आढळून आलेल्या दाताच्या खुना आरोपीच्या आहे, त्यांच्या घरुन जप्त केलेल्या अश्‍लिल सीडी व मोबाईलमध्ये अश्‍लिल छायाचित्रे सापडली, घटनेआधी तिघांनी पिडीतेची छेड काढली आणी दमबाजी केली या बाबी सरकार पक्षातर्फे साक्षी व परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे सिद्ध केल्या आहेत. घटनेच्या दिवशी आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ व नितीन भैलुमे घटनास्थळाजवळ असलेल्या चारीवर दुचाकीवरुन चकरा मारत होते. स्पष्ट केलेल्या चोवीस मुद्याच्या विचार करता
पुराव्याची साखळी तयार होत आहे. तिघांनी एकत्र येऊन कट रचला, बलात्कार करुन पिडीतेचा खुन केला. घटनेवेळी भवाळ व भैलुमे यांनी दुचाकी अडबाजूला
ठेवली होती. एका साक्षीदाराच्या ते नजरेस पडले म्हणून पळून गेले, त्यामुळे त्यांना बलाकाराची संधी मिळाली नाही, मात्र त्यांच्याही मनात अत्याचार करण्याची सुप्त भावना होती.'' आरोपीचे वकील ऍड. बाळासाहेब खोपडे, ऍड. योहान मकासरे, ऍड. प्रकाश आहेर उपस्थित होते.

उद्या (शनिवारी) आरोपींतर्फे असलेले एकमेव साक्षीदार रविंद्र चव्हाण यांच्या साक्षीवर  ऍड. निकम युक्तिवाद करणार आहेत. 

'मिस कॉल' करुन दिला संदेश
ऍड. उज्ज्वल निकम म्हणाले, ''पिडीतेवर अत्याचार करुन खून केला त्याच वेळी आरोपी जितेंद्र शिंदेने भवाळ व भैलुमे मिस कॉल दिला होता. शिवाय दुसऱ्या कॉलमध्ये तीस सेंकदाचे बोलणे झाले. त्याबाबत ते खुलासा करु शकले नाहीत. घटनेआधी दोन दिवस तिघांनीही पिडीतेची छेड काढली होती. त्यामुळे ती
दोन दिवस शाळेत गेली नाही आणि घटनेनंतर त्यांचे एकमेकांना फोनवर बोलणे
म्हणजे हे कृत्य तिघांनी 'ठरवून केलेला कट आहे'.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com