ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगूल वाजला..! 

सुनील पाटील
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

कोल्हापूर : जिल्ह्यातील 478 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी येत्या 14 ऑक्‍टोबर रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज (शुक्रवार) यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली. यंदा सरपंचपदाची निवड थेट जनतेतून होणार आहे, हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे. 

या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आजपासून या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 

नोव्हेंबर आणि डिसेंबर 2017 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम आज आयोगाचे अवर सचिव आर. व्ही. फणसेकर यांनी जाहीर केला. जिल्हातील 478 ग्रामपंचायतींची मुदत या कालावधीत संपत आहे. ग्रामपंचायतींच्या सदस्यांसह सरपंचपदाची निवडणूकही होणार आहे. सरपंच पदासाठी थेट जनतेतून मतदान होणार आहे. या सरपंच निवडीच्या निमित्ताने गावागावांतील राजकीय चुरस, इर्षा यामुळे वातावरण ढवळून निघणार आहे. 

कोल्हापूरमध्ये दुसऱ्या टप्प्यात ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. 

  • मतदान होणाऱ्या ग्रामपंचायती : 478 
  • मतदान : 14 ऑक्‍टोबर 
  • मतमोजणी : 16 ऑक्‍टोबर 
  • निवडणूक निकाल : 17 ऑक्‍टोबर 
  • अर्ज भरण्याचा कालावधी : 22 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 
  • अर्ज छाननी : 3 ऑक्‍टोबर 
  • अर्ज मागे घेण्याची मुदत : 5 ऑक्‍टोबर 
  • निवडणुकीसाठी चिन्ह देणे आणि निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे : 5 ऑक्‍टोबर