श्रमशक्ती कृष्ती महाविद्यालयात कृषिदूतांचे मार्गदर्शन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

अकोले : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, सेवा संस्कार संस्थेच्या श्रमशक्ती कृषी महाविद्यालयात चौथ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी म्हणजे कृषिदूतांनी अकोले तालुक्‍यातील इंदोरी येथे 'आले' या पिकाचे शेतात अंतरमशागतीचे प्रात्यक्षिक घेऊन परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 

गावातील प्रगतीशील शेतकरी निवृत्ती नवले यांच्या शेतातील आले पिकात काल (गुरुवार) हे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या प्रात्यक्षिकासाठी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कृषिदूतांकडून या प्रात्यक्षिकाच्या वेळी वेगवेगळ्या पिकांमध्ये केली जाणारी अंतरमशागत आणि शेतकऱ्यांचे होणारे फायदे याविषयी सविस्तर माहिती देऊन अधिक उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. 

यासाठी कृषिदूत सूरज देशमुख, शैलेश काशीद, योगेश सांडभोर, अक्षय ससे, शुभम नवले, संकेत लासुरे यांनी विशेष परिश्रम घेतले. 

श्रमशक्ती कृषी महाविद्यालय येथील कृषिदूतांकडून इंदोरीत वेगवेगळ्या विषयांवर प्रात्यक्षिके घेतली जात आहेत. इंदोरी परिसरातील शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल, असा विश्‍वास उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी श्रमशक्ती कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद हारदे, प्रा. रवींद्र दसपुते, कार्यक्रम अधिकारी प्रा. मनोज माने, प्रा. निकम आणि प्रा. जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.