‘सायबर सिक्युरिटी’ काळाची गरज : डॉ. सामंत खजुरिया

हरिभाऊ दिघे
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

तळेगाव दिघे ( जि. नगर ) : संपूर्ण विश्‍वात रॅन्समवेअर या व्हायरसमुळे वेब विश्‍व पूर्णपणे ठप्प झाले होते. बँक सर्व्हर, एटीएम, उद्योगविश्‍व, आय.टी. क्षेत्रामध्ये या सायबर अ‍ॅटॅकमुळे हडकंप उडाला होता. खाजगी माहिती चोरणे, बँकेचे व्यवहार ठप्प होणे यामुळे भारतालाही मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागला. त्यामुळे ‘सायबर सिक्युरिटी’ काळाची गरज बनली आहे, असे विचार डेन्मार्क येथील अ‍ॅलबॉर्ग विद्यापीठाचे सह प्राध्यापक डॉ. सामंत खजुरीया यांनी व्यक्त केले.

तळेगाव दिघे ( जि. नगर ) : संपूर्ण विश्‍वात रॅन्समवेअर या व्हायरसमुळे वेब विश्‍व पूर्णपणे ठप्प झाले होते. बँक सर्व्हर, एटीएम, उद्योगविश्‍व, आय.टी. क्षेत्रामध्ये या सायबर अ‍ॅटॅकमुळे हडकंप उडाला होता. खाजगी माहिती चोरणे, बँकेचे व्यवहार ठप्प होणे यामुळे भारतालाही मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागला. त्यामुळे ‘सायबर सिक्युरिटी’ काळाची गरज बनली आहे, असे विचार डेन्मार्क येथील अ‍ॅलबॉर्ग विद्यापीठाचे सह प्राध्यापक डॉ. सामंत खजुरीया यांनी व्यक्त केले.

संगमनेर येथील अमृतवाहिनीच्या आय.टी. विभागात आयोजित ‘सिक्युरिटी अँड प्रायव्हसी इन सायबर स्पेस’ या आतंरराष्ट्रीय विषयावर व्याख्यान ते बोलत होते.

डॉ. सामंत खजुरीया यांनी सायबर सिक्युरिटीमधील तांत्रिक गोष्टींचा आढावा घेतला. सायबर अ‍ॅटॅकचे अनेक प्रकार आणि अ‍ॅटॅक थांबविण्याच्या उपाययोजना त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर सांगितल्या. सिक्युरिटी आणि प्रायव्हसी या दोन्ही प्रकारातील वेगवेगळे अल्गोरिदम त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. आय.ओ.टी., बिग डेटा, डेटाबेस, नेटवर्किंग, क्लाऊड, डेटा मायनिंग या सर्व आय.टी. विभागांमध्ये सिक्युरिटी कशा प्रकारे राखली जाऊ शकते याचे मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी आय.टी. विभागाच्या वतीने प्रा. सुदीप हासे यांनी संपादित केलेल्या ‘अन्वेष’ या मासिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

मागील सत्रात आय.टी. विभागात घेण्यात आलेले सर्व उपक्रम या मासिकात प्रकाशित करण्यात आले आहे. व्याख्यानाच्या दुसर्‍या सत्रात डॉ. खजुरीया यांनी भारताबाहेरील विद्यापीठ, त्या विद्यापीठांचे विविध अभ्यासक्रमाचा आढावा घेतला. अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांचे शंका निरसन करण्यात आले. डॉ. सामंत खजुरीया यांनी अमृतवाहिनी मधील विद्यार्थ्यांना आय.टी. क्षेत्रातील असलेल्या ज्ञानाविषयीचे कौतुक केले. विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात घेण्यात आलेले विविध उपक्रम, आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील निवड याविषयी डॉ. खजुरीया यांनी महाविद्यालयाच्या मॅनेजमेंटचे विशेष कौतुक केले.

विभागप्रमुख डॉ. बी. एल. गुंजाळ यांनी आपल्या प्रस्तावनेत आय.टी. विभागाने आयोजित केलेले विविध उपक्रम व सायबर सिक्युरिटीच्या गरजेविषयी आढावा घेतला. प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांनी भारत सर्व क्षेत्रात पुढे आहे मात्र नवनवीन तंत्रज्ञान शिकण्यामध्ये मागे पडत असल्याचे सांगितले. वेबसाईट हॅक होणे, मोबाईलमधील खाजगी माहिती चोरणे या घटना गंभीर असून विद्यार्थ्यांनी सायबर सिक्युरिटी मधील ज्ञान अवगत करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

विद्यार्थ्यांनी शेवटी व्याख्यानाविषयी आपले मत मांडले. प्रास्ताविक प्रा. अनिता गवळी यांनी केले, तर आभार समन्वयक प्रा. बी. एस. बोरकर यांनी मानले. या व्याख्यानात आय.टी. विभागातील 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅलबॉर्ग विद्यापीठ, डेन्मार्क येथील सह प्राध्यापक डॉ. सामंत खजुरीया हे उपस्थित होते. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या विश्‍वस्त सौ. शरयुताई देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, रजिष्ट्रार प्रा. व्ही. पी. वाघे, व्याख्यानाच्या संयोजिका आणि विभागप्रमुख डॉ. बी. एल. गुंजाळ, समन्वयक प्रा. बी. एस. बोरकर, वर्कशॉप विभागाचे प्रमुख प्रा. आर. एस. ताजणे, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.