मी शेतकऱ्यांसाठी बेभान झालोय : सदाभाऊ खोत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

ताकारी : "माझ्यावर मी बेभान झालोय, अशी टीका करणाऱ्यांना मला एवढेच सांगायचे आहे की, होय मी शेतकऱ्यांसाठी व विकासकामांसाठी बेभान झालोय. मी टीका करणार नाही. ती माझी संस्कृती नाही, असे म्हणत वाळवा तालुक्‍यातील गावांत विकासकामांसाठी दिलेल्या निधीची आकडेबाजी स्वतः कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगून आक्रमकपणे "सदाभाऊ काय करतोय? व सदाभाऊ बेभान झालेत' या टीकेला प्रत्युत्तर दिले. 

रेठरेहरणाक्ष येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. पांडुरंग मोरे अध्यक्षस्थानी होते. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, जिल्हा सरचिटणीस वैभव शिंदे, आरपीआयचे अरुण कांबळे, भास्कर कदम, प्रसाद पाटील, सुहास पाटील प्रमुख उपस्थित होते. 

मी तालुक्‍यात मंजूर करून आणलेल्या विकासकामांचे नारळ विरोधक फोडत आहेत. हा टोला मंत्री खोत यांनी आमदार जयंत पाटील यांचे नाव न घेता लगावला. ते म्हणाले,""उसाच्या 12 टक्के रिकव्हरीला आता 3217 रुपये मिळावेत, यासाठी कायदा केला. मला बेभान म्हणणाऱ्यांना एवढेच सांगायचं आहे, कायद्याने तुम्ही 3217 मिळवून दाखवले का?'' 

निशिकांत पाटील म्हणाले,""वाळवा तालुक्‍यातील विकासकामांसाठी सदाभाऊ मंत्री झाल्यापासून 117 कोटी 96 लाखांचा निधी आला.'' 

वैभव शिंदे म्हणाले,""राष्ट्रवादीत आमचे पाय ओढण्याचे काम झाले. त्यामुळेच पक्ष सोडला, स्वार्थासाठी नाही. आष्टा तालुका व्हावा ही आमची आग्रही मागणी आहे. यावर लवकरच निर्णय होऊन आष्टा तालुका अस्तित्वात येईल.'' धैर्यशील मोरे यांनी स्वागत केले. राहुल बेले यांनी आभार मानले. धनाजी मोरे, डॉ. निवास पवार, शरद अवसरे, उदय पवार, महंमद आंबेकरी, दादासाहेब रसाळ, किरण चव्हाण, संतोष पाटील, अभिजित पाटील, शशिकांत साळुंखे, संजय पवार, सर्जेराव मोरे, सुभाष चव्हाण, विक्रम शिंदे, माणिक जाधव, विशाल पाटील, सचिन पवार आदी उपस्थित होते.