दरोड्यामुळे लोक बिथरले अन् पोलिसही हादरले 

Representational Image
Representational Image

कऱ्हाड: जिल्ह्यातील महामार्गावर पोलिसांनी वाढवलेली नाकाबंदी, हाकेच्या अंतरावरील नाकाबंदी, तासवडे टोल नाक्यावर सुरू असलेले चेकींग अशा प्रत्येकाला बगल देत उंब्रज येथे एकाच रात्री पाच वेगवेगळ्या ठिकाणी दरोडे टाकून थेट पोलिसांच्या कार्यक्षमतेला आव्हान दिले आहे.

दरोड्यात सुमारे ५५ तोळ्यांच्या सोन्याचा लंपास करताना दरोडेखोरांच्या हल्ल्यात एका महिलाही ठार झाली आहे. तोंडावर बुरखा घालून व मोठा टेम्पो घेऊन आलेल्या दरोडेखोरांच्या रात्रभराच्या धुडगुसाने सामान्य नागरीक बिथरला आहे. जिल्ह्यातील पोलिस यंत्रणाही हादरली आहे. घटनास्थळाचे सीसीटीव्हीचे फुटेज हाच एकमेव पुरावा हाती घेऊन दरोड्याच्या मुळापर्यंत जाण्याचे कसब पेलावे लागणार आहे. 

जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार येथे ठाण मांडून होते. पोलिसांच्या हातात तरिही त्यांच्या हाती केवळ सीसीटीव्हीचे फुटेज वगळता काहीही पुरावा हाती आला नाही.

चाळीसहून गावांची मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या उंब्रजची पहाट दरोड्याच्या दुर्देवी घटनेने उजाडली. बाजारपेठेतील मुख्य बंगल्यात पडलेल्या दरोड्यांनी उंब्रजकरांच्या मनात धास्ती निर्माण केली. महामार्गापासून अवघ्या दीडशे ते दोनशे फुटावरील घरांना टार्गेट करत चोरट्यांनी घातलेला धुमाकूळ पोलिसांच्या कार्यक्षमेताला आव्हान देणारा ठरला. पाटण तिकाटणे, बस स्थानक, इंदोली फाटा, शिवडे फाटा येथे उंब्रज पोलिसांचे रात्री नाकाबंदी असते. महामार्गावर गस्त घालणारे पथक नेहमीच सतर्क असते. त्या सगळ्यांचा डोळा चुकवून चोरट्यांनी मारलेला डल्ला पोलिसांना आव्हानात्मक आहे.

महामार्गावर डाव्या बाजूला मुख्य बाजारपेठेत सोहेल अल्ताफ मुल्ला यांच्या मोठ्या बंगल्यात चोरटे मागील दारातून शिरले. दोन भाऊ एकत्र मात्र वेगवेगळ्या बंगल्यात राहतात. त्यातील पहिल्या बंगल्यात जैबुन करीम मुल्ला आजी खालच्या मजल्यावर झोपल्या होत्या. चोरटे घरात शिरून एवज लंपास करत होते. त्यावेळी त्यांना जाग आली. मात्र क्षणाचाही वळे न घालवता त्यांच्या तोंडावर उशी दाबून त्यांचा चोरट्यांनी जीव घेतला. त्यानंतर निर्दयी चोरटे तेथून शेजारच्या बंगल्यात शिरले. तेथे जाग आलेल्या मुलांनी आरडोओरडा केला. त्यामुळे चोरटे तेथून पसार झाले. ते थेट रस्त्याच्या पलिकडील मोरखळ यांच्या घरावर त्यांनी निशाना साधला.

तेथे बाहेर मोठा टेम्पो त्यांनी लावून घरात शिरण्याचा प्रय़त्न केला. मात्र तेथील लोक जागी झाल्याने बंगल्याच्या आवारात शिरलेले चौघेजण तारेचे कम्पाउंड तोडून पळाले. ते पाटण तिकाटण्याच्या पलीकडील बाजूस आतील मार्गाने शिरले. तेथे कुंभार यांच्या घरात शिरून तेथील एवज लंपास केला. त्यानंतर मोठ्या टेम्पोत बसून ते कामत शिवडे फाट्यावर आले. तेथे कामत रेस्टारंट फोडून त्यांनी तेथील रक्कम लंपास केली. तेथून ते कऱ्हाडच्या दिशेने सुसाट गेले. 

जिल्ह्यातील महामार्गावर पोलिसांनी गस्त पथक कडक केली आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

चोरटे मध्यरात्री दीडच्या सुमारास टेम्पोतून फिरत होते. ते कोणत्याच गस्त पथकाला कसे दिसले नाही. तासवडे टोलनाक्यावरूनही तेथेही रात्रगस्तीचे पोलिस असतातच त्यांनीही त्यांच्या तपासणी केली नाही. चोरट्यांनी अत्यंत शिताफीने चोरी केली आहे.

एकाही ठिकाणी त्यांना त्यांचा पुरावा ठेवलेला नाही. त्यामुळे श्वान पथक व ठसे तज्ञ बोलावूनही फारसा उपयोग जाला नाही. चोरट्यांनी तोडांवर बुरखा होता. त्यांच्या हातात मोजे होते. त्यांनी कोणत्याही दुसऱ्या वस्तू हात लावला नाही. त्यामुळे घटनास्थळावर पोलिसांना त्यांचा काहीच माग मिळाला नाही. मात्र प्रत्येक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यातही बुरखा स्पष्ट दिसतो आहे. मुल्ला यांच्या बंगल्यावरील, कामात रेस्टारंट व कुंभार यांच्या घराबाहेरचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज हाच त्यांच्यासाठी तपासाचा मुख्य आधार बनला आहे. त्यावरून त्यांनी ही टोळी आंतर जिल्ह्यात चोऱी करणारी टोळी आहे, असा कयास लावत लातूर, बीड, उस्मानाबाद येथील टोळ्यांना लक्षे केले आहे.

त्यामुळे उंब्रजच्या दरोड्याच्या तपासाचे आव्हान पोलिस पेलणार कसे हाच करा प्रश्न आहे. 

पोलिसांच्या नजरेतून सुटले
दरोडेखोरांनी पोलिसांच्या नजरेतून सुटून चोरीचे केलेले प्लॅनिंग पोलिसांनाच आव्हान देणारे आहे. मुख्य बाजारपेठ, शिवडे फाटा, पाटण तिकाटणे ठिकाणी रात्रभर पोलिसांची गस्त असते. मात्र एकाही पोलिसाला तो टेम्पो किंवा तोंडाला बुरखा बांधणारे लोक दिसले नाहीत, याचे आश्चर्य वाटते आहे. मुख्य बाजारपेठेत चोरीनंतर काही वेळाने पोलिस तेथे पोचले. त्यावेळी चोरटे रस्त्याच्या पलिकडील घरे फोडत होते. त्यामुळे पोलिसांनी त्याचवेळी योग्य बंदोबस्त लावला असता तर कदाचित दरोडेखोर सापडले असते.

पाचही ठिकाणी किमान अर्धा तासाच्या फरकाने चोरट्यांनी हातसफाई केली आहे. त्यामुळे चोरीच्या पहिल्या ठिकाणी पोलिस पोचले त्यावेळी चोरटे तेथूनच रस्त्याच्या पलिकडच्या बाजूला दोनशे मीटरवर पाटण तिकाटण्यावर कुंभार यांच्या घरात शिरले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com