सातारा : कामगाराला मारहाण करणार्‍या दोघांना अटक

सातारा : कामगाराला मारहाण करणार्‍या दोघांना अटक

वहागाव (जि. सातारा)  : वराडे गावच्या हद्दीतील पार्वती हॉटेलसमोर तासवडे औद्योगिक वसाहतीतील कामगाराला मारहाण करून त्याचाकडील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतल्याप्रकरणी तळबीड पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

राहुल विलास मानकर  (वय-३२) रा. तळबीड, संतोष महादेव इंगळे (वय-३६) रा. वराडे, नितीन हणमंत थोरात (रा. तासवडे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून पोलिसांनी राहुल मानकर व संतोष इंगळे यांना याप्रकरणी अटक केली आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, तासवडे औद्योगिक वसाहतीतील कामगार सुधीर कोकाटे हे तासवडे येथील एका कंपनीत नोकरीस आहेत. काल (ता.२०) ते नेहमीप्रमाणे सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरी जात असताना संशयीत आरोपी राहुल मानकर, संतोष इंगळे व नितीन थोरात यांनी संगनमत करून आपल्याकडील दुचाकी  (क्रमांक-एम एच-११-एक्स-९०९७) वरुन येऊन फिर्यादी कोकाटे यांच्याकडे पैसे असल्याचा खोटा आरोप करुन शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरुवात केली तसेच नजीकच्या झाडाची काठी करुन मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर श्री. कोकाटे यांच्या खिशातील सुमारे सात हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल हिसकावून घेतला. व ते तेथून निघून गेले. त्यानंतर श्री. कोकाटे यांनी तळबीड पोलिसांत तक्रार देताच पोलिसांनी संशयितांना मुद्देमालासहित ताब्यात घेतले. पोलिसांनी राहुल मानकर, संतोष इंगळे यास अटक केली असून नितीन थोरात हा फरार झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com