सातारा पालिकेत विरोधी पक्ष नेत्यास धक्काबुक्की 

सिद्धार्थ लाटकर
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

सातारा : सातारा पालिकेच्या गुरुवारी सर्वसाधारण सभा होती. एका दमात 25 विषयांना मंजूरी दिल्याने सभेनंतर खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी सातारा विकास आघाडी आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील नगरविकास आघाडी यांच्या नगरसेवकांमध्ये जोरदार वादावादी झाली.

यामध्ये सातारा विकास आघाडीचे नगरसेवक वसंत लेवे आणि विरोधी पक्ष नेता अशोक मोने यांच्यामध्ये वाद वाढला. लेवे हे मोनेंच्या अंगावर धावून गेले. त्यांनी मोनेंना धक्काबुक्की केली. 

यामुळे सभागृहात तणाव निर्माण झाला. दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या सहा सदस्य सत्ताधारी सातारा विकास आघाडीच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी काळा रंगाचे कपडे परिधान करुन सभेस आले होते. तसेच त्यांनी तोंडावर काळ्या रंगाच्या पट्ट्या बांधल्या होत्या.