स्वाभिमानीचा ऊसतोडी बंद करुन आंदोलनाचा पुन्हा एल्गार 

हेमंत पवार
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

कऱ्हाड : साखर कारखान्यांनी पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरु करु नये असा इशारा देऊनही साखर कारखान्यांनी हंगाम सुरु केल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कालपासून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

काल रात्री संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मसूर जवळील हणबरवाडी परिसरात ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांच्या चाकाची हवा सोडण्यात आली. दरम्यान आज सकाळी स्वाभिमानीच्या जिल्हा उपाध्यक्ष देवानंद पाटील, जिल्हा प्रवक्ते विकास पाटील, कराड दक्षिण अध्यक्ष बापूसो साळुंखे, उपाध्यक्ष राकेश पाटील, काले विभाग प्रमुख रामचंद्र साळुंखे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ऊसाच्या फडात जाऊन वाठार, आटके, रेठरे बुद्रुक, काले या चार गावातील ऊस तोडी आज बंद पाडल्या.

त्यामुळे आंदोलनाची तीव्रता आता वाढु लागली आहे.