नगरजवळ अपघात, तीन तरूणांचा मृत्यू

सूर्यकांत नेटके
शनिवार, 20 जानेवारी 2018

नगर : नगर-पुणे रस्त्यावर शहरापासून जवळ असलेल्या केडगावाजवळ दुचाकी व चारचाकी वाहनांचा अपघात झाला. त्यात तीन महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू झाला आहे. मात्र त्यांची नावे उपलब्ध नाहीत असे पोलिसांनी सांगितले. 
केडगावाजवळ एक चारचाकी गाडीचा टायर फुटल्याने ती समोरून येणारया दुचाकीवर जोरात आदळली. त्यामुळे तिघांचा मृत्यू झाला चारचाकी गाडीचे तर मोठे नुकसान झालेच, पण दुचाकीचाही चक्काचुर झाला.  

चारचाकी गाडी आणि दुचाकीची धडक होऊन तीन जण जागीच ठार झाले. केडगाव येथे आज दुपारी साडेबारा वाजता हा अपघात झाला. मृत्यू झालेल्या तिघात एक श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथील, एक सावेडी उपनगरातील ढवणवस्ती व एक जण निर्मलनगर येथील असल्याचे सांगण्यात. कोतवाली पोलिस ठाण्यात गून्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Marathi news nagar news accident three dies