संगमनेर: बेपत्ता बालकाचा मृतदेह आढळला 

crime
crime

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक शिवारातील प्रवरा नदीपात्रालगत समर्थ एकनाथ क्षिरसागर या दोन वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह आढळला. तो सोमवारपासून बेपत्ता होता. मंगळवारी (ता. १२) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : एकनाथ क्षिरसागर हे आपल्या कुटुंबियांसमवेत धांदरफळ बुद्रुक याठिकाणी राहत आहे. सोमवार ता. ११ डिसेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांचा दोन वर्षाचा मुलगा समर्थ हा घराजवळून बेपत्ता झाला होता. क्षिरसागर कुटुंबियांनी त्याचा सगळीकडे शोध घेतला. मात्र तो सापडला नव्हता. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास धांदरफळ बुद्रुक शिवारातील नदीपात्रालगत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी शाम रंगनाथ काठे (रा.कोल्हेवाडी, ता. संगमनेर) यांनी खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अनिल जाधव अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com