पेट्रोलपंप लुटण्याच्या तयारीतील सहा दरोडेखोर पकडले

सूर्यकांत नेटके
रविवार, 14 जानेवारी 2018

पाच जणांना संपवण्याचा कट उघड
घनशाम पाटील म्हणाले, अझहर शेख हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्यांच्यावर खुनासह अन्य गंभीर गुन्हे आहेत. नगरमधील राष्ट्रवादीचे नगरसेवक समद वहाब खान उर्फ समदखान मेंबर यांच्याशी पुर्ववैमान्यष्य आहे. शेख याने समदखान यांच्यासह शहा निजाम नन्नेमिया, सादीक अल्लाबक्ष शेख, आझीम हनीफ खान व जुबेर बाबामियॉं सय्यद या पाच जणांना संपवण्याचा कट केला होता. त्यासाठीच त्याने पाच कट्टे आणलेले आहेत अशी पोलिस चौकशीत प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोघांची दुष्मनी एवढ्या टोकाला कशामुळे गेली याचाही पोलिस तपास करत आहेत.

नगर : पेट्रोलपंप लुटण्यासाठी जाणाऱ्या सहा दरोडेखोरांना पकडले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने नगर शहर उपनगरातील हस्त बेहस्त पडका महाल (भिस्तबाग) परिसरात शनिवारी (ता. 13) मध्यरात्री ही कारवाई केली. त्यांच्याकडून पाच गावठी कट्टे, तीस जिवंत काडतुसे, दोन स्वतंत्र मॅग्झिन, एक मोटारकार, नऊ मोबाईल असा तीन लाख 77 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अझहर मंजुर शेख (वय 36, रा. बेलदार गल्ली, सर्जेपुरा), सोमनाथ उत्तम दळवी (वय 23, रा. भिस्तबाग चौक), गुड्डू उर्फ शहानवाज हमीद सय्यद (वय 37, रा. नॅशनल कॉलनी, महेराज मज्जिद जवळ, मुकुंदनगर), सचिन कोंडीराम जाधव (वय 25,रंगोली हॉटेल मागे, भुषणनगर, केडगाव), हरिओम धर्मेंद्र सहदेव (वय 16, रा. गंजबाजार, गांधी गल्ली), सिद्धेश संदीप खरमाळे (वय 20, रा. भांडगाव, ता. पारनेर) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहे. किशोर आरणे (रा. धुतसागर चर्चजवळ, सोनेवाडी रोड, केडगाव) हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला आहे. अझहर शेख यांच्यासह पकडलेल्यांवर अनेक गंभीर गुन्हे आहेत. त्याने राष्ट्रवादीचे नगरसेवक समदखान वहाब खान यांच्यासह पाच जणांना संपवण्याचा शेख याने कट रचला होता, त्यासाठीच पाच गावठी कट्टे आणल्याचे पोलिस चौकशीत उघड झाले आहे असे अतिरिक्त पोलिस अधिक्षक घनशाम पाटील यांनी सांगितले.

अझहर शेख हा त्याच्या साथीदारांसह औरंगाबाद रस्त्यावर पेट्रोलपंप लुटण्यासाठी जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार पवार यांनी पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, घनशाम पाटील यांनी माहिती दिली. आरोपी भिस्तबाग महालाकडून जाणार असल्याची पक्की खात्री असल्याने स्वतः पवार यांच्यासह सहायक पोलिस निरिक्षक डॉ. शरद गोर्डे, संदीप पाटील, पोलिस निरिक्षक राजकुमार हिंगोले, श्रीधर गुट्टे, रवी कर्डीले, अण्णा पवार, मन्सुर सय्यद, सोन्याबापू नाणेकर, उमेश खेडकर, भाऊसाहेब काळे, सुनील चव्हाण, रवि सोनटक्के, भागिनाथ पंचमुख, दिपक शिंदे, योगेश सातपुते, विशाल दळवी, देविदास काळे यांच्यासह जवळपास पस्तीस पोलिसांच्या पथकाने भिस्तबाग महालाजवळ सापळा लावला. रात्री उशिरा सुरवातीला वेगात आलेली मोटारकार पोलिसांनी अडवली. त्यामागून दुचाकीही वेगात येत होती. पोलिसांनी अडवल्याचे दिसताच दुचाकीस्वराने परत वळवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मोटारकारमधील पाच जण व दुचाकीचा पाठलाग करुन एकास पकडले. एकजण मात्र उडी मारुन अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. आरोपीकडे मिळून आलेले गावटी कट्टे कोठून आणले यासह अन्य बऱ्याच बाबी तपासात समोर  येतील असे असे घनशाम पाटील यांनी सांगितले. सहायक पोलिस अधिक्षक अक्षय शिंदे व मनिष कलवानिया, पोलिस निरिक्षक दिलीप शिंदे यावेळी उपस्थित होते.

पाच जणांना संपवण्याचा कट उघड
घनशाम पाटील म्हणाले, अझहर शेख हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्यांच्यावर खुनासह अन्य गंभीर गुन्हे आहेत. नगरमधील राष्ट्रवादीचे नगरसेवक समद वहाब खान उर्फ समदखान मेंबर यांच्याशी पुर्ववैमान्यष्य आहे. शेख याने समदखान यांच्यासह शहा निजाम नन्नेमिया, सादीक अल्लाबक्ष शेख, आझीम हनीफ खान व जुबेर बाबामियॉं सय्यद या पाच जणांना संपवण्याचा कट केला होता. त्यासाठीच त्याने पाच कट्टे आणलेले आहेत अशी पोलिस चौकशीत प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोघांची दुष्मनी एवढ्या टोकाला कशामुळे गेली याचाही पोलिस तपास करत आहेत.

Web Title: Marathi news Nagar news decoit arrested