आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकास राष्ट्रकुल शिष्टमंडळाची भेट 

Babasaheb Ambedkar memorial
Babasaheb Ambedkar memorial

तळेगाव दिघे ( जि. नगर ) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमध्ये वास्तव्य केलेल्या व भारतीयांसाठी ऐतिहासिक वारसा ठरलेल्या निवासस्थानास ( स्मारक ) काँग्रेस नेते संगमनेर तालुक्याचे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या राष्ट्रकुल शिष्टमंडळाने अवर्जून भेट दिली.

लंडनमधील 10 किंग्ज हेन्री रोड, एन. डब्ल्यु - 3 या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेल्या निवासस्थानास राष्ट्रकुल शिष्टमंडळाने भेट माहिती घेतली. हे निवासस्थान सध्या महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक वास्तु म्हणून खरेदी केले आहे. या निवासस्थानास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावरील फोटो प्रदर्शन लावण्यात आलेले आहे. या निवासस्थानातील वास्तव्या दरम्यान डॉ. आंबेडकर यांनी लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेतून 'बार अ‍ॅट लॉ' ही पदवी संपादन केली. तसेच विविध विषयांवर संशोधन ही केले होते. या वास्तुशी डॉ. आंबेडकर यांच्या अनेक आठवणी जुळल्या आहेत. हे निवासस्थान आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून सन्मानित झालेले आहे.

आमदार थोरात म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विश्‍वरत्न आहे. अफाट बुध्दीमत्ता असलेल्या या व्यक्तीमत्वाने भारतीय राज्य घटना व समृध्द लोकशाही ही मोठी देणगी जगाला दिली. राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडीत नेहरु यांच्या कार्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा प्रभाव आहे. इंग्लडमधील आंबेडकरांचे स्मारक हे भारतीयांसाठी स्फुर्तीस्थान आहे. या स्मारकास भेट देवून मोठा आनंद झाला असल्याचे आमदार थोरात व शिष्टमंडळातील सदस्यांनी सांगितले.

महाराष्ट्र विधान भवनाच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे 10 आमदारांचे शिष्टमंडळ काँग्रेसनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली 10 दिवस युरोपच्या दौर्‍यावर होते. या दौर्‍यात त्यांनी ब्रिटीश पार्लमेंट, स्वीस पार्लमेंट, फ्रेंच पार्लमेंट व युनोच्या विविध आंतराष्ट्रीय संघटनांच्या कामकाजाची माहिती घेतली. विविध देशांमधील प्रमुखांशी संवाद साधून गुंतवणूकीसाठी महाराष्ट्राच्या भाौगोलिक अनुकुलतेबाबत माहिती देवून त्यांना निमंत्रित केले. या दौर्‍यात लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाची भेट प्रेरणादायी ठरली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com