नगर-'स्त्री भ्रूण' हत्या रोखण्यासाठी प्रबोधन

Nagar
Nagar

तळेगाव दिघे (नगर) : जिल्हा माहिती अधिकारी, नगर व रसिक कला मंच, पुणे यांच्यातर्फे अनुसूचित जातीसाठी असलेल्या शासनाच्या योजनांची विद्यार्थी - विद्यार्थीनींना माहिती दिली जात आहे. 'आई गं मारू नको तू मला, सांग बाबांना येऊ दे जन्माला..' अशा गीतांद्वारे रसिकचे कलाकार भावनिक साद घालीत 'स्त्री भ्रूण' हत्या रोखण्यासाठी प्रबोधन केले.

तळेगाव दिघे (ता. संगमनेर) येथील न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात 'स्त्री भ्रूण' हत्येवर आधारित प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आला. जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, प्राचार्य बाळकृष्ण कुटे, उपमुख्याध्यापक संपत मुळे उपस्थित होते. या कार्यक्रमात 'रसिक'चे नरेंद्र सावंत, रसिका सावंत, अनुजा पाद्ये, शेखर भागवत, केतन साळवी, प्रकाश सुतार, कीर्तीराज बनसोडे कलाकार सहभागी झाले होते.

रसिकच्या कलाकारांनी गण गौळण सादर करून अनुसूचित जातीच्या विद्यार्थी - विद्यार्थीनींना मिळणाऱ्या शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. 'आई गं मारू नको तू मला, सांग बाबांना येऊ दे जन्माला..' या भावनिक गीताचे विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. प्रास्ताविक संजय दिघे यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रभान हापसे यांनी केले. रामहरी भागवत यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com