संगमनेर: गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

crime
crime

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील वडगावलांडगा येथे राहत्या घराच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत एका युवकाने आत्महत्या केली. राहुल विजय लांडगे ( वय २२ ) असे त्याचे नाव आहे. शनिवारी ( दि. १६ ) दुपारी एकच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.

वडगावलांडगा येथे राहत्या घरात पत्र्याच्या छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत राहुल विजय लांडगे याचा मृतदेह आढळून आला. दुपारी एकच्या सुमारास कुटुंबियांच्या हा प्रकार लक्षात आला. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर पोलसांनी घटनास्थळी येत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर कुटीर रुग्णालयात हलविला. त्याच्या आत्महत्येमागील निश्चित कारण समजू शकले नाही.

बाळासाहेब तुकाराम लांडगे यांनी खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुनील वाकचौरे अधिक तपास करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com