फलटण, लोणंद ठाण्यात 11 छावण्यांविरुद्ध गुन्हे 

फलटण, लोणंद ठाण्यात 11 छावण्यांविरुद्ध गुन्हे 

फलटण - सन 2012-13 व 13-14 या आर्थिक वर्षात सुरू असलेल्या चारा छावण्यांमध्ये अनियमितता आढळून आलेल्या फलटण तहसीलच्या कार्यक्षेत्रातील 11 चारा छावण्यांविरुद्ध फलटण व लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. उर्वरित सात छावण्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नायब तहसीलदार नंदकुमार भोईटे यांनी दिली आहे. 

उच्च न्यायालयाकडील जनहित याचिकेवर चारा छावण्यांतील अनियमिततेसंबंधी सुनावणी झाली. संबंधित चारा छावणी चालकांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद करणेबाबत अतिरिक्त सरकारी अभियोक्ता व उपसचिवांकडून प्राप्त झाल्याने फलटण तहसीलमधील एकूण 18 छावण्यांमध्ये अनियमितता आढळून आली होती. त्यांच्याविरुद्ध पूर्वीच दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. तथापि, त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंद करण्याबाबत गिरवी, आदर्की, वाठार निंबाळकर, बरड व तरडगावच्या मंडलाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांच्या पत्रानुसार लेखी कळविले होते. त्यानुसार आजअखेर 11 छावण्यांविरोधात फलटण ग्रामीण व लोणंद पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उर्वरित सात छावण्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

गुन्हे दाखल करण्यात आलेल्या चारा छावणीचे नाव व गाव पुढीलप्रमाणे ः विजय ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित आदर्की बुद्रुक, दुधेबावी विकास सोसायटी दुधेबावी, तरडगाव विकास सोसायटी तरडगाव, रणजितदादा नाईक निंबाळकर मोटर वाहतूक संस्था फलटण-ढवळपाटी, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण, शंभू महादेव विकास सोसायटी ढवळ-शेरेचीवाडी, वाठार निंबाळकर विकास सोसायटी वाठार निंबाळकर, मांडव खडक विकास सोसायटी मांडव खडक, फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण, तरडफ विकास सोसायटी तरडफ, कापशी विकास सोसायटी कापशी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com