नगर जिल्ह्यातील तळेगाव दिघेमधील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट

हरिभाऊ दिघे
गुरुवार, 13 जुलै 2017

पेरणीसाठी पुरेसा झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी केली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने संगमनेर तालुक्‍यातील अवर्षणप्रवण असलेल्या तळेगाव दिघे परिसरातील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.

तळेगाव दिघे (जि. नगर) - पेरणीसाठी पुरेसा झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी केली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने संगमनेर तालुक्‍यातील अवर्षणप्रवण असलेल्या तळेगाव दिघे परिसरातील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.

संगमनेर तालुक्‍यातील अवर्षणप्रवण असलेल्या तळेगाव भागात यंदा जून महिन्यात पावसाने हजेरी लावली. पेरणीसाठी पुरेसा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली. मात्र त्यानंतर परिसरात मोठा पाऊस झाला नाही. पावसाने दडी मारल्याने खरीप उभारणी संकटात सापडली असून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. तळेगाव भागात वर्षानुवर्षे दुष्काळी स्थिती कायम आहे. त्यामुळे शेती व्यवसाय धोक्‍यात आला आहे. येणाऱ्या प्रत्येक वर्षात अत्यल्प पाऊस होतो. यावेळी जून महिन्यात झालेल्या साधारण पावसावर शेतकऱ्यांनी बाजरी,सोयाबीन,मठ,मुग,भुईमुग पिकांची पेरणी केली. जूनच्या सुरवातीला पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावले होते. मात्र खरिपाच्या पेरणीनंतर पावसाने दडी मारली. काही गावांच्या शिवारात अद्याप पावसाअभावी पेरण्या प्रलंबित आहेत. जुलै महिना उजाडला असताना अनेक ठिकाणी अदयाप चारा - पाणीटंचाई कायम आहे. विहिरी, कूपनलिका कोरड्याठाक आहेत. खरिप उभारणी वेळेवर झाली,मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. तळेगाव भागातील शेतकरी सध्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.