कासच्या भूमिपुत्रांचे श्रमदानात योगदान

कासच्या भूमिपुत्रांचे श्रमदानात योगदान

सातारा - सातारकरांची तहान भागवण्यासाठी स्वत:चे गाव अन्‌ जमिनीचा त्याग करणाऱ्या कास ग्रामस्थांनी आज कास तलाव परिसरात श्रमदान करून स्वच्छता केली.

‘सकाळ’च्या पुढाकाराने श्रमदानामध्ये आज कास ग्रामस्थांनी योगदान दिले. पावसावर अवलंबित शेती असलेल्या या डोंगरी भागातील बहुतांश लोक जमीन कमी असल्यामुळे व उदरनिर्वाहाचे अन्य साधन नसल्याने मुंबई येथे कष्ट करतात. गावी ज्येष्ठ नागरिक व महिला असतात. युवा वर्ग अभावानेच गावी आढळतो. १८८५ मध्ये कास गावाचे विस्थापन करून ब्रिटिशांनी कास तलाव बांधला. हा तलाव सव्वाशे वर्षांहून अधिक काळ सातारकर व परिसरातील १७ गावांची तहान भागवत आहे.

कृतज्ञ भावनेतून आज सकाळी कास ग्रामस्थांनी सुमारे दोन तास श्रमदान करत कास स्वच्छता मोहिमेत योगदान दिले. त्यामध्ये विष्णू सुर्वे, यशवंत किर्दत, गणपत शेलार, रानू किर्दत, अनंता किर्दत, गंगाराम काळे, दिनकर जांभळे, बळिराम किर्दत, विकास किर्दत, आबाजी किर्दत, जयराम किर्दत, योगेश शेलार, नेहा किर्दत यांनी भाग घेतला. दोन तासांत १२ पोती प्लॅस्टिक कचरा 

वेचण्यात आला. कास स्वच्छता मोहिमेतील समन्वयक विशाल देशपांडे, सुधीर सुकाळे, निखिल वाघ यांनीही श्रमदान केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com