"कास'वर श्रमदानाद्वारे महिला दिन 

"कास'वर श्रमदानाद्वारे महिला दिन 

सातारा - प्लॅस्टिकचा वापर टाळणार, निसर्गात कचरा फेकणार नाही. सर्वात शुद्ध म्हणून नावाजलेल्या कास तलावाची पावित्र्य कायम राखणार, असा निर्धार आज जागतिक महिला दिनी कास येथे जमलेल्या महिला भगिणींनी केला. "कासाई' या देवतेपरी कृतज्ञता व्यक्त करत आज सुमारे सव्वाशे महिलांनी कास तलाव परिसरात श्रमदान करून अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला. 

विशेष म्हणजे दोन वर्षांच्या शरयू या लहानग्या मुलीपासून 76 वर्षांच्या शीला गिते यांच्यापर्यंत विविध वयोगटातील महिला व युवतींचा सहभाग हे आजच्या श्रमदानाचे वैशिष्ट्य होते. "सकाळ'च्या पुढाकाराने लोकसहभागातून सुरू झालेल्या कास स्वच्छता मोहिमेत आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विशेष श्रमदान कार्यक्रम राबविण्यात आला. "सकाळ'ने श्रमदानात सहभागी होण्याबाबत केलेल्या आवाहनास उदंड प्रतिसाद मिळाला. महिला मंडळे, भिशी ग्रुप, योग साधना वर्ग, महाविद्यालयीन युवती, तनिष्का गट व "मधुरांगण'च्या सदस्यांबरोबर अनेक महिला व्यक्तिश: या श्रमदानात सहभागी झाल्या होत्या. 

सकाळी नऊ ते दहा असे एक तास या महिलांनी श्रमदान केले. प्लॅस्टिक टोपन, कागद, बाटल्या, खाद्यपदार्थांचे वेस्टन, प्लॅस्टिक, काचेच्या बाटल्या, नष्ट न होणारे द्रोण व पत्रावळ्या आदी कचरा महिलांनी वेचून काढला. सुमारे 40 पोती कचरा वेचण्यात आला. तत्पूर्वी या मोहिमेचे समन्वयक डॉ. दीपक निकम, सुनील भोईटे, विशाल देशपांडे, निखिल वाघ यांनी उपस्थितांना निसर्गपूरक जीवनाबद्दल माहिती दिली, तसेच श्रमदानाबाबत मार्गदर्शन केले. 

आजच्या श्रमदानात पूर्वा योग साधना वर्गाच्या वैशाली भोसेकर, शैलजा क्षीरसागर, रजनी कुलकर्णी, स्नेहा हसबनीस, अश्‍विनी देशपांडे, मालती बडवे, माधवी गोडसे, अनुपमा वेलणकर, सीमा गजवाणी, सुजाता फरांदे, सिंधू जाधव, रोहिणी आंबेकर, ऊर्मिला कुलकर्णी, गीता हंकारे, कलावती शिंदे, मंगला काळे, मुग्धा कुंभारे, रेखा ताम्हाणे, सुनंदा चौकवाले, कांता शहा, सुजाता कुलकर्णी, स्वाती तारळकर. धस कॉलनीतील नवचैतन्य बचत गटाच्या रजनी खराडे, सुनीता लोहार, अलका चव्हाण, संगीता पिंपळे, शोभा तावरे, सुनंदा खामकर, अंजना खाडे, ऍवॉर्ड संस्थेच्या नीलिमा कदम. जयश्री चौकवाले, नूरजहॉं नदाफ, सुमन सूर्यवंशी, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या शीला गिते, अरुणा शिंदे, स्नेहप्रभा राजोपाध्ये, अश्‍विनी निंबाळकर, शकुंतला पाटील, डॉ. सुनंदा पाटील, शुभदा मुळे, वंदना निकम, निर्मला सावंत, दीपाली शिराळ, रूपाली सावंत, रंजना साठे, वंदना कांबळे, राधा दोडके, नीलिमा बिरारी, अर्चना कुलकर्णी, दौलतनगर तनिष्का गटाच्या सीमा दाते, शालन पोटे, अलका कारंडे, छाया दुबळे, ऍड. शीतल शिंदे, शांतशीला भोईटे, संगीता वाघमारे, सुलभा मानकुमरे, शोभा देशमुख, अर्चना भोसले, रेश्‍मा डोंबरे, शुभांगी घाडगे, यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयातील डॉ. प्रतिमा पवार- भोईटे, प्रा. योगिता घाडगे व वनस्पतीशास्त्र शाखेच्या 25 विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. 

...यांचे योगदान  
महिला दिनानिमित्त विशेष श्रमदान उपक्रमात सक्रिय सहभाग देत पंताचा गोट येथील "पाटील वडेवाले'चे संचालक संजय व अलका पाटील यांनी अल्पोपहार व चहाची व्यवस्था केली होती. सकाळी साताऱ्यातून कासला जाऊन त्यांनी श्रमदान करणाऱ्या महिलांना गरमागरम समोसे खाऊ घातले. सावकार ट्रॅव्हल्सचे संचालक, माजी नगराध्यक्ष प्रकाश गवळी यांचे नेहमीची कास स्वच्छता मोहिमेस सहकार्य असते. आजही त्यांनी श्रमदानात सहभागी महिलांची ने- आण करण्यासाठी साताऱ्यातून दोन बस उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यामुळेच महिलांना कासला नेणे शक्‍य झाले. 

महिलांचा प्रतिनिधी स्वरूपात गौरव 
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामातून समाजमनावर कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महिलांचा प्रतिनिधी स्वरूपात गौरव करण्यात आला. त्यामध्ये योगाभ्यास वर्ग घेणाऱ्या वैशाली भोसेकर, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या शीला गिते, तनिष्का समन्वयक भारती जगताप, स्वाती चव्हाण, जिल्ह्यातील पहिली महिला सर्पमैत्रीण मृण्मयी जाधव यांचा महिलांच्या हस्ते रोप देऊन गौरविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com