दारूचा काळाबाजार उत्पादन शुल्क विभागाकडून उघड

liquor
liquor

कऱ्हाड : कऱ्हाड व पाटण तालुक्यातल वाढणाऱ्या अवैध दारू वाहतूकीसह भट्टी करून होणाऱ्या दारूचा काळाबाजार उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईने उघड झाला. मागील पंधरा दिवसात किमान पाच मोठ्या कारावाया दोन्ही तालुक्यात झाल्या. त्यात चोरटी वाहतूक होणारी किमान वीस लाखांच्या दारू जप्त झाली.

कालही रात्री अखरा लाखांची दारू वाहनासह भरारी पथकाने जप्त केली. बनावट दारू तयार करणारे दोन छोटेखानी कारखानेही कारवाईत उद्ध्वस्त झाले. पाटणला तर तोरणा भागात हातभट्टी उध्वस्त करण्यात आली. त्यामुळे दोन्ही तालुक्यात होणाऱ्या दारूच्या काळाबाजाराला नक्की कोणाचे पाठबळ आहे, त्याचा शोध घेवून त्या संबधिताचा पर्दाफाश केल्याशिवाय दारूच्या उद्योगाला लगाम लागणे कठीण आहे. 

कऱ्हाड व पाटण तालुक्यात पंधार दिवसाता दारू विरोधी विक्रमी कारवाया झाल्या. त्यात दारूची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. किमान दहा लाखांची दारू त्या कारवाईत जप्त झाली आहे. विरवडे येथे तर बनावट दारू निर्मितीचा कारखाना उत्पादन शुल्कने उद्ध्वस्त केला. पाटण तालुक्याच्या तोरणा भागात हातभट्टी उध्वस्त करून मोठ्या प्रमाणात दारू जप्त झाली. त्यापूर्वी कोकणातून येणारी बनावट व देशी विदेशी दारूही जप्तीची कारवाई झाली होती. कऱ्हाड तालुक्याशी कनेक्शन असलेल्या खटावच्या गाटमात्यावरही अवैध दारू वाहतूक रोखली गेली. उंडाळे भागात पहाटे दारू पोच करणाऱ्यास अटक झाली. पंधरा दिवसात झालेल्या कारवाईत अवैध दारूच्या वाहतूकीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात ठळक झाले. त्याबरोबर ती दारू गोवा भागातून आणल्याचे तपासात पुढे आले. त्यामुळे कऱ्हा़ड व पाटणमध्ये अवैध दारूचा काळाबाजार करणाऱ्यांच्या गोव्यात असलेले लागेबांधेही उघड होत आहेत. त्याच्या तपासाचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांना पाठबल कोणाचे आहे, त्यात राजकीय हस्तक्षेप आहे का याचा शोध घेताना उत्पादन शुल्क खात्याला अनेक पातळ्यावर तपासाची सुत्रे हलवावी लागणार आहेत. यापूर्वीचा झालेला तपासाचा अनुभव कोलवर तपास होताना दिसत नाही. यावेळी तसाच प्रयत्न झाला तर कारवाई सुरू आहे. तोपर्यंत अवैध काळा बाजार झाकला जाईल, कारवाई थंड जाली की, तोच काळाबाजार पुन्हा जोमाने सुरू राहिल, ही स्थिती बदलण्यासाठी शेवटच्या घटकापर्यंत तपास नेण्यासाठी उत्पादन शुल्कला प्रयत्न करण्याची गरज आहे. 

दारूची होणारी अवैध वाहतूकीबरोबर दोन्ही तालुक्यात बनावट दारू निर्मितीचे कारखाने तयार करण्याचे प्रमाणत अळीकडच्या पाच वर्षात वाढले आहे. पाच वर्षापूर्वी तासवडे, ढेबेवाडी भागात अशा कारवाया जाल्या होत्या. तासवडेच्या कारवाईत पाच वर्षापूर्वी तीन हजार बाटल्या, पाच हजार बुच व विदेशी दारूच्या दोनशे बाटल्या सापडल्या. त्या कारखान्यात बनावट दारू तयार केली जात असल्याची शंका होता.मात्र त्याचा तपास काय झाला. त्यात काय साध्य झाले ते समजू शकले नाही. चार ते पाच दिवसापूर्वी विरवडे येथे बनावट दारूचा कारखाना उध्वस्त करण्यात आला. त्यातही अशाच प्रकारचे साहित्य जप्त झाले. त्याचाही शेवटपर्यंत तपास करण्याचे आव्हान उत्पादन शुल्कपुढे आहे. पाटण तालुक्याच्या तोरणा भागात हातबट्टी उध्वस्त केली. त्यालाही पाठबळ कोणाचे होते, त्याचा तपास होण्याची गरज आहे. या सगळ्याच्या तपासासाठी उत्पादन शुल्क नेमकी काय शक्कल लढवणार याकडेही लक्ष लागून आहे. तपासावर अधिकाऱ्यांवर येणारा दबाव व त्यात होणारा हस्तक्षेप थांबम्याची गरज आहे. त्याचबरोबर त्या बनावट दारूच्या तपासात उत्पादन शुल्कने खोलवर जाण्याची गरज आहे. 

अशी झाली कारवाई 
- पाटणला कोकणातून येणारी लाखोची दारू जप्त
- विरवडे येथे बनावट दारूचा कारखाना उध्वस्त
- पाचवड फाट्यावर दारूची वाहतूक अवैध रोखून लाखोचा मुद्देमाल जप्त
- खटावच्या घाटमाथ्याकडे निघालेली दारूची वाहतूक अवैध जप्त 
- तोरणा भागात हातभट्टी उध्वस्त करून अवैध दारू जप्त 
- महामार्गावर गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक रोखून अकारा लाखाची दारू जप्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com