कऱ्हाड: चौदा जण एक वर्षासाठी नऊ तालुक्यांतून हद्दपार

police
police

कऱ्हाड : शहर व परिसरात निरंतर मटक्याचा अड्डा चालणाऱ्या टोळी प्रमुखासह चौदा जणांना एक वर्षासाठी नऊ तालुक्यांतून हद्दपार करण्यात आले आहे.

पोलिस अधिनियम सन 1951 च्या कलम 55 अन्वये त्यांच्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी कारवाई केली आहे. त्यांना सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड, सातारा, पाटण, खटाव, माण कोरेगाव आणि सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा व शिराळा तालुक्यात एक वर्ष न येण्याची बंदी आहे. संबधितांचे मटक्याचे अड्डे आहेत. त्यांच्यावर वारंवार कारवाई होवूनही मटक्याच्या बुकी बंद करत नसल्याने पोलिस अधीक्षकांनी त्यांना हद्दपार केले आहे, असे पोलिसनिरिक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितले.

त्यात टोळी प्रमुख अल्ताफ पठाण (वय 48, रा. मंगळवार पेठ) याच्यासह शाहीद पठाण (37, रा. मंगळवार पेठ), अमीर तांबोळी (37, रा. हजारमाची), रवि दोडमनी (33, शनिवार पेठ), रमेश औंधे (48, ओगलेवाडी), सुनील खैरे (32, मलकापूर), रोहित म्हासाळ (27, मलकापूर), रामदास कावरे (32, बुधवार पेठ), आबूटी परियाट (60, रा. शास्त्रीनगर, मलकापूर), गणेश वायदंडे (18, बुधवार पेठ), शशिकांत भोसले (60, रा. मंगळवार पेठ), विकास गुजर (34, रा. नडशी), अमीत पाटील (24, मलकापूर) व हिरगेस हिरामणी (43, रा. दौलत कॉलनी) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. तडीपार संबंधीत टोळी शहरात बेकायदा मटका जुगार चालवित होती. त्यांच्यावर वेळोवेळी गुन्हे दाखल करून अटक झाली आहे. मात्र तरीही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांच्याकडून सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. तसेच त्यांच्यावर कडक कारवाईसाठी मागणी होत होती. त्यांच्याकडून हिंसक घटना घडण्याची भिती व दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून या टोळीतील 14 जणांना हद्दपार केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com