खा. उदयनराजेंच्या 11 समर्थकांना तात्पुरता अटकपूर्व जामीन 

सिद्धार्थ लाटकर 
मंगळवार, 23 जानेवारी 2018

मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी (ता. 22) खासदार समर्थकांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्याची आज न्यायमूर्ती साधना जाधव यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले समर्थकांना सात फेब्रुवारीपर्यंत तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.

सातारा : सुरुची धुमश्‍चक्रीप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक पंकज चव्हाण, रुपेश सपकाळ, विकी यादव, दीपक धडवई, युवराज शिंदे, सनी भोसले, विवेक जाधव, अमोल हदगे, अमर आवळे, सुजित आवळे, सनराज साबळे यांना उच्च न्यायालयाने आज (मंगळवार) तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. 

मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी (ता. 22) खासदार समर्थकांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्याची आज न्यायमूर्ती साधना जाधव यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले समर्थकांना सात फेब्रुवारीपर्यंत तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. खासदार भोसले समर्थकांच्यावतीने अशोक मुंदरगी व शैलेश चव्हाण यांनी काम पाहिले. 

Web Title: Marathi news Satara News MP Udayanraje bhosale activist got bail