बदलीसाठी अर्ज करणाऱ्या शिक्षकांना आज "डेडलाईन' 

बदलीसाठी अर्ज करणाऱ्या शिक्षकांना आज "डेडलाईन' 

सातारा - प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांच्या दुसऱ्या टप्प्याला सुरवात झाली असून, ते उद्यापर्यंत (ता. 21) सुरू राहील. बदलीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी पोर्टल उपलब्ध झाल्याने यापूर्वी माहिती भरण्यापासून वंचित राहिलेल्या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. 

ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या करण्याचा निर्णय गतवर्षी घेतला होता. तत्पूर्वी आंतरजिल्हा बदल्यांचा पहिला टप्पा पूर्ण झाला होता. मात्र, एकूणच बदली प्रक्रियेला स्थगिती मिळाल्याने पुढील बदल्या चालू शैक्षणिक वर्षापुरत्या थांबविण्यात आल्या. आता ग्रामविकास विभागाचा पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीपूर्वी बदल्यांची प्रक्रिया उरकण्याचा मानस असून, त्यासाठी गतिमान प्रक्रिया राबविली जात आहे. 2017 मध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया राबविण्यात आली होती. सातारा जिल्हा परिषदेतून 301 शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या. या प्रक्रियेत अनेक शिक्षकांनी ऑनलाइन अर्ज भरूनही त्यांच्या बदल्या होऊ शकल्या नव्हत्या. अनेक शिक्षकांचे बदली अर्ज भरायचे राहून गेले होते. या शिक्षकांसाठी बदली प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. उद्या (ता. 21) सायंकाळी पाचपर्यंत डेटा दुरुस्ती व अर्ज करता येतील. त्यापूर्वी बदलीसाठी भरलेले अर्ज ड्राफ्ट मोडमध्ये असून, संबंधित शिक्षकांनी त्याची पडताळणी (व्हेरिफाय) करायची आहे. त्यात काही त्रुटी किंवा चुका असतील, तर त्या दुरुस्त करता येतील. "ड्राफ्ट मोड'मध्ये नाव व माहिती असलेल्या शिक्षकांनी अर्ज पडताळणी करणे आवश्‍यक आहे; परंतु अर्ज पडताळणी न केल्यास मुदत संपताच अर्ज पुन्हा पडताळणी केले जाणार असून, बदलीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. 

...तर शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई? 
तक्रार निवारणासाठी शिक्षकांनी एनआयसी (पुणे) या संस्थेत उपस्थित राहू नये, तशा सूचना शिक्षकांना देण्यात याव्यात व सूचना देऊनही तक्रार निवारणासाठी शिक्षक संस्थेत आल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com