Tuberculosis
Tuberculosis

प्रतिकार क्षमता घटण्याने क्षयरोगाचा धोका

जिल्ह्यात २२३७ क्षयरुग्ण; लाखामागे साडेआठ हजारांची प्रतिकार क्षमता कमी
सातारा - जिल्हाभरातील दवाखाने आता ‘हाउसफुल’ दिसू लागले आहेत. त्यामागे प्रामुख्याने घटती प्रतिकार क्षमता हे प्रबळ कारण पुढे येत आहे.

साधारणत: लाखामागे आठ हजार ५०० लोकांची प्रतिकार क्षमता कमी आढळून येत आहे. त्यामुळे क्षयरोगांचे प्रमाण वाढत चालले आहे. जिल्ह्यात सध्या दोन हजार २३७ क्षयरुग्ण आहेत. क्षयरोग हा केवळ फुफ्फुसाचा राहिला नसून गंडमाळ (लसिका ग्रंथी), मेंदूच्या आवरणाचा (मेनिनजायटीस), मणक्‍याचा क्षयरोगही वाढत आहे.

जागतिक क्षयरोग दिन २४ मार्चला साजरा होतो. जागतिक स्तरावरून राबविण्यात येणाऱ्या क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातून राष्ट्रीय, राज्य व जिल्हा स्तरावरही क्षयरोग शोध कामाबाबत देखरेख ठेवली जात आहे. क्षयरोग हा सूक्ष्मजंतू ‘मायकोबॅक्‍टेरियम ट्युबरक्‍युलॉसिस’मुळे होतो. जेव्हा फुप्फुसाचा एखादा क्षयरुग्ण खोकतो किंवा शिंकतो, या वेळी क्षयरुग्णाच्या तोंडातून सूक्ष्म थेंब बाहेर पडतात. या सूक्ष्म थेंबात क्षयरोगाचे जंतू असतात. हा सूक्ष्म थेंब हवेत बराच वेळ तरंगत असतो. ज्या वेळी निरोगी व्यक्ती ही हवा नाकाद्वारे आत घेतो, त्या वेळी श्‍वासातून क्षयरोगाचा जंतू त्या व्यक्तीच्या शरीरात जातो व त्यास क्षयरोगाचा संसर्ग होतो.

देशात दररोज ४० हजारांहून अधिक व्यक्तींना क्षयरोगाच्या जंतूंचा संसर्ग होतो. दररोज पाच हजारांहून अधिक लोकांना क्षयरोग होतो.

देशात दररोज ४० हजारांहून अधिक व्यक्तींना क्षयरोगाच्या जंतूंचा संसर्ग होतो. दररोज पाच हजारांहून अधिक लोकांना क्षयरोग होतो. दररोज एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण क्षयरोगामुळे मरण पावतात. सातारा जिल्ह्यामध्ये तीन हजारांपेक्षा जास्त क्षयरुग्णांना उपचार दिला जातो. त्यापैकी दीड हजारांपेक्षा जास्त क्षयरुग्ण हे नवीन थुंकीदूषित असतात व उरलेले थुंकीअदूषित असतात. या नवीन थुंकीदूषित क्षय रुग्णांमधील साधारणतः सहा टक्‍के क्षयरुग्ण मृत्यू पावतात. नवीन क्षयरुग्णांमध्ये बरे होण्याचे प्रमाण ८५ ते ९० टक्‍क्‍यांदरम्यान आहे. 

फुफ्फुसाचा क्षयरोग आणि फुफ्फुसाव्यतिरिक्त क्षयरोग हे दोन प्रकार आहेत. फुफ्फुसाव्यतिरिक्त क्षयरोगामध्ये गंडमाळा (लसिका ग्रंथी), मेंदूच्या आवरणाचा क्षयरोग (मेनिनजायटीस), मणक्‍याचा क्षयरोग हे प्रकार आहेत.

मानेवर सूज व गाठी येतात. डोकेदुखी, ताप, ग्लानी, मानेचा ताठपणा ही लक्षणे मेंदूच्या आवरणाच्या क्षयरोगात आढळतात. प्रामुख्याने प्रतिकार क्षमता कमी होत असल्याने, तसेच एचआयव्ही बाधित, कुपोषित, मधुमेही व्यक्‍तींमध्ये क्षयरोगाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे रुग्णांनी वेळोवेळी तपासणी करणे आवश्‍यक असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. राजेश गायकवाड यांनी दिली.

१७५१ - फुफ्फुसाचा क्षयरोग
४८६ - फुफ्फुसाव्यतिरिक्‍त क्षयरोग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com