श्रीरामपूरचे माजी आमदार जयंत ससाणे यांचे निधन 

श्रीरामपूरचे माजी आमदार जयंत ससाणे यांचे निधन 

श्रीरामपूर - शिर्डी येथील साईबाबा संस्थानाचे माजी अध्यक्ष, श्रीरामपूरचे माजी आमदार, माजी नगराध्यक्ष व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे (वय 60) यांचे दीर्घ आजाराने आज पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. माजी नगराध्यक्ष राजश्री ससाणे यांचे ते पती; तर श्रीरामपूरचे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांचे ते वडील होत. येथील अमरधाम स्मशानभूमीत ससाणे यांच्यावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. 

ससाणे गेल्या काही महिन्यांपासून फुफ्फुसाच्या कर्करोगाने आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातच त्यांचे आज निधन झाले. श्रीरामपूरचे नगरसेवक, नगराध्यक्षपदापासून त्यांनी आपल्या राजकारणास सुरवात केली. नगर जिल्ह्याच्या उत्तर भागातील चतुर राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांनी आपल्या स्वभावामुळे श्रीरामपूर मतदारसंघावर पकड निर्माण केली होती. (स्व.) गोविंदराव आदिक यांचे समर्थक म्हणून सुरवातीला त्यांना ओळखले जायचे. त्यानंतर माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे समर्थक म्हणूनही त्यांनी श्रीरामपूरचे नगराध्यक्षपद सांभाळले. कॉंग्रेसफुटीनंतर निर्माण झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मुरकुटे यांच्यासोबत जाण्याचे टाळून त्यांनी जाणीवपूर्वक कॉंग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. मुरकुटे यांचा पराभव करून ते दोन वेळा श्रीरामपूरचे आमदार झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com