महापालिकेतील नेतृत्वासाठी भाजप नगरसेवकात चढाओढ

BJP
BJP

सोलापूर : महापालिका सर्वसाधारण सभेतील सूचना वाचायला मिळावी यासाठी भाजपमधील अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. मात्र, ती वेळ येणार नाही, गरज पडलीच तर प्रदेशाकडून येणाऱ्या नावाला संधी दिली जाईल, असे भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी "सकाळ'ला सांगितले. 

सभागृहनेते सुरेश पाटील यांना मधुमेहाचा त्रास होऊ लागल्याने पंधरा दिवसापासून  सहकारी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली व उपचाराची माहिती घेतली. परिणामकारक उपचार न झाल्याने श्री. पाटील यांना काल  पुण्याला हलविण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतील त्यांच्या जागेची जबाबदारी पेलवण्याची तयारी अनेकांनी केली आहे. 

येत्या बुधवारी (ता.20) महापालिकेची सर्वसाधारण सभा होणार आहे. गेल्या दहा महिन्यांत अनेक सभा तहकूब झाल्याने ही सभा चालवावी लागेल अशी मागणी होत आहे. तसे झाल्यास हंगामी सभागृह नेत्याची जबाबदारी एकाला द्यावी लागणार आहे. ती कुणाला द्यायची हा विचार अद्याप श्रेष्ठींमध्ये सुरू नाही, मात्र काही नगरसेवकांनी "ती'जबाबदारी पेलायची तयारी केली आहे. या प्रकाराबाबत प्रा. निंबर्गी यांनी नाराजी व्यक्त केली. सभा चालली तरच सूचना वाचण्याची गरज पडेल, असे संकेत देतानाच, गरज भासल्यास याबाबत प्रदेश पातळीवरील नेत्यांशी चर्चा करून नाव निश्‍चित केले जाईल, असे प्रा. निंबर्गी म्हणाले. 

महापालिका सभेची सूचना वाचण्यासाठी पर्यायी नगरसेवकाची गरज भासणार नाही. श्री. पाटील सभेपूर्वीच बरे होतील आणि तेच महापालिकेच्या सभेत सूचना वाचतील याची खात्री आहे. 
- प्रा. अशोक निंबर्गी, शहराध्यक्ष सोलापूर शहर भारतीय जनता पक्ष 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com