सायकल ट्रॅकच्या मार्गावर उभारणार सौरऊर्जा प्रकल्प 

cycle track solar energy
cycle track solar energy

सोलापूर : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील पहिला "सायकल ट्रॅक' साकारणार आहे. त्याअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते डफरीन चौकादरम्यान असलेल्या ट्रॅकच्या मार्गावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. 

प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात 12 किलोमीटरच्या "सायकल ट्रॅक'चे नियोजन आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून 1.2 किलोमीटरचा सायकल ट्रॅक असणार आहे. मूळ प्रस्ताव हा रंगभवन चौक ते डफरीन चौक ते डॉ. आंबेडकर चौक असा आहे. त्यापैकी रंगभवन ते डफरीन चौकादरम्यानचा ट्रॅक हा सर्वसाधारण असेल. तर डफरीन चौक ते डॉ. आंबेडकर चौकापर्यंतच्या रस्त्यावर सौर प्रकल्प असेल. ट्रॅक झाल्यावर वैयक्तिक वाहनांचा वापर कमी होण्यास मदत होणार आहे. सौरऊर्जा प्रकल्पामुळे सायकलस्वारांची सोय होण्यासह वीजनिर्मिती होणार आहे. दैनंदिन चार ते पाच मेगावॉट वीजनिर्मिती या प्रकल्पापासून होईल अशी अपेक्षा आहे. 
सध्या पुणे, मुंबई आणि चेन्नईमध्ये अशा पद्धतीचे ट्रॅक आहेत. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात करण्यात येणाऱ्या विकासकामांमध्ये सायकल ट्रॅकचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यासाठी जो परिसर निश्‍चित करण्यात आला आहे, त्या ठिकाणी हा ट्रॅक बनविला जाईल. त्यासाठी काही भाग मोटारींसाठी बंद करण्यात येणार आहे. हा संपूर्ण परिसर प्रदूषणमुक्त राहील, याची दक्षता घेतली जाणार आहे. 

ही घ्यावी लागेल काळजी  

  • चारचाकींपेक्षा सायकलींसाठी सोयी वाढवा.  
  • सायकली ठेवण्यासाठी हवे अद्ययावत वाहनतळ. 
  • सार्वजनिक वाहतूक आणि सायकलींना रस्त्यावर प्राधान्य 
  • काही रस्ते खासगी मोटार वाहतुकीसाठी करावेत बंद 
  • सायकल ट्रॅक शास्त्रशुद्ध, अखंडित बांधले जातील, याची काळजी घ्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com